शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan: तालिबानला घाबरून अफगाणिस्तानच्या पायलटांचा नोकरीला रामराम; लष्कर हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 14:38 IST

Afghan Air Force pilot leaving job after taliban attack सर-ए-पुल, कुंदुज आणि तालोकान वर कब्जा केल्याच्या एक दिवस नंतर तालिबानने ऐबक ताब्यात घेतले. जरंज आणि शेबरघन शहरे गेल्याच आठवड्यात ताब्यात घेण्यात आली आहेत.

तालिबानने (Taliban) अफगानिस्तानवर (Afghanistan) जबरदस्त पक़ड मिळविण्यास सुरुवात केली आहे. पायदळ तालिबानींसोबत लढत असताना त्यांना कव्हर देणारे हवाईदल मात्र, गायब झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे तालिबानींनी लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने आणि वाईट परिस्थितीत असलेल्या लढाऊ विमानांमुळे अफगानिस्तानच्या हवाई दलाचे पायलट नोकरी सोडत आहेत. (Afghan Air Force pilot killed in Kabul bombing, attack claimed by Taliban)

तालिबानने एका आठवड्याच्या आत सहाव्या शहरावर कब्जा केला आहे. यामुळे अफगानिस्तान लष्कराचे मनोबल खच्ची होत आहे. अशातच तालिबान्यांवर हवाई हल्ले केले तर लष्कराची लढाई सोपी होई. परंतू पायलटच पळ काढू लागल्याने तालिबान्यांचे फावले आहे. समांगन प्रांताची राजधानी ऐबकवर सोमवारी जिहादी गटाने कब्जा केला. तालिबानने ट्विट करून सांगितले की, ऐबकचे सर्व सरकारी कार्य़ालये आणि पोलीस चौक्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. 

सर-ए-पुल, कुंदुज आणि तालोकान वर कब्जा केल्याच्या एक दिवस नंतर तालिबानने ऐबक ताब्यात घेतले. जरंज आणि शेबरघन शहरे गेल्याच आठवड्यात ताब्यात घेण्यात आली आहेत.लश्कर गाह, कंधार आणि हेरातमध्ये भाषण युद्ध सुरु आहे. तर अफगानिस्तानच्या उत्तरेडील सर्वात मोठे शहर मजार-ए-शरीफ वर हल्ला करण्यात आला. 

आठ पायलटांची हत्या गेल्या काही आठवड्यांत आठ पायलटांची हत्या झाली आहे. यामध्ये ब्लॅक हॉक पायलट हमीदुल्लाह अज़ीमी देखील आहेत. शनिवारी त्यांच्या कारमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. काबुलजवळ बॉम्ब फुटल्याने त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये अन्य पाच नागरिक जखमी झाले. गेल्या काही दिवसांत 19 पायलटांनी हवाई दलाची नोकरी सोडली आहे. एका पायलटाने सांगितले की, नोकरीवर येताना दररोज वेगवेगळ्या कार, वाहनांमधून जावे लागते. काही मित्र आहेत त्यांच्या कार मागाव्या लागतात. घरातूनही बाजारात जाता येत नाही. केस कापायलाही जाऊ शकत नाही. मी आता नोकरी सोडण्य़ाचा विचार करत आहे. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानpilotवैमानिक