शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडातील भारतीय अन् विद्यार्थ्यांसाठी विदेश मंत्रालयाकडून ॲडव्हायजरी जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 16:03 IST

भारतीय विदेश मंत्रालयाने आज दुपारी भारतीय नागरिकांसाठी एक ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी केली आहे.

नवी दिल्ली - कॅनडाचेपंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्या विधानानंतर कॅनडातील भारतीय नागरिक चिंताग्रस्त बनले आहेत. त्यातच, आपली कमकुवत स्थिती खलिस्तानी समर्थकांच्या माध्यमाने बळकट करण्याचा प्रयत्न करत जस्टिन ट्रूडो सरकारने कॅनडातील नागरिकांसाठी एक ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी केली. त्यानुसार, भारताच्या जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर, आता भारताने कॅनडातील भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी केली आहे. 

भारतीय विदेश मंत्रालयाने आज दुपारी भारतीय नागरिकांसाठी एक ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी केली आहे. कॅडनात राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, तसेच, जे भारतीय कॅनडाला जाणार आहेत, त्यांनीही काळजी घ्वावी, असे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. कॅनडामध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना व विद्यार्थ्यांना भारत सरकारने महत्त्वाची सूचना केली आहे. भारत विरोधी अजेंड्याला विरोध करणाऱ्या नागरिकांना किंवा भारतीयांना धमक्या देण्यात येत आहेत. त्यामुळे, भारत विरोधी अजेंडा सुरू असलेल्या प्रदेश आणि भागात न जाण्याचे केंद्र सरकारने या अॅडव्हायजरीच्या माध्यमातून सूचवले आहे. 

 

काय आहे प्रकरण? -

खालिस्तान समर्थक नेता हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर आरोप केले आहेत. कॅनडाच्या संसदेत बोलताना, हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारतीय एजन्ट्सचा हात असू शकतो, असे पंतप्रधान ट्रुडो यांनी म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी भारताच्या राजदुतालाही बर्खास्त केले. यावर भारतानेही याच पद्धतीची अ‍ॅक्शन घेत कॅनडाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

कॅनडा सरकारकडून कॅनडियन नागरिकांना सूचना

कॅनडा सरकारच्या ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हणण्यात आले आहे की, सुरक्षिततेच्य कारणास्तव कॅनडाच्या नागरिकांनी जम्मू आणि काश्मीरचा प्रवास करू नये. या भागात दहशतवाद, अशांतता आणि अपहरणाचा धोका आहे. मात्र, कॅनाडाने जारी केलेल्या या अ‍ॅडव्हायजरीत केंद्र शासित प्रदेश लडाखचा उल्लेख करण्यात आलेला नाही. याशिवाय, या अ‍ॅडव्हायजरीमध्ये, कॅनडाच्या नागरिकांना नॉर्थ ईस्टमधील राज्य आसाम, आणि मणिपूरमध्ये देखील न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :prime ministerपंतप्रधानInternationalआंतरराष्ट्रीयCanadaकॅनडा