बर्लिन : अल कायदाशी संबंधित दहशतवादी गट अबू सय्याफने फिलिपाईन्समध्ये डांबून ठेवलेल्या दोन जर्मन नागरिकांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. ५६ लाख अमेरिकन डॉलर्सची खंडणी न दिल्यास व इस्लामिक स्टेटविरुद्ध (आयएस) अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवाईत जर्मनीने भाग घेतल्यास या दोघांना ठार मारले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. या मागण्या मान्य करण्यासाठी अबू सय्याफने १० आॅक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे.
दोन जर्मनांच्या हत्येची अबू सय्याफची धमकी
By admin | Updated: September 26, 2014 05:12 IST