शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

26/11 हल्ल्याचा आरोपी अब्दुल रहमान मक्कीचा पाकिस्तानात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 14:32 IST

Abdul Rahman Makki Death: अब्दुल रहमान मक्की, हा 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मेव्हूणा होता.

Abdul Rahman Makki Death: भारताचा शत्रू आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज अब्दुल रहमान मक्की याचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मक्की हा लष्कर-ए-तैयबा (एलईटी)चा उपप्रमुख आणि 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज मोहम्मद सईदचा नातेवाईक होता. मिळालेल्या माहितीनुसार, मक्की याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

अब्दुल रहमान मक्की याचा पाकिस्तानातील लाहोरमध्ये मृत्यू झाला आहे. 2023 मध्ये मक्कीला संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी घोषित केले होते. त्याची सर्व संपत्तीही जप्त करण्यात आली होती. मक्की लष्कर-ए-तैयबाच्या राजकीय शाखेचे नेतृत्व करायचा. याशिवाय तो जमात-उद-दावाचा प्रमुखही होता. लष्कराच्या परराष्ट्र संबंध विभागाची जबाबदारी त्याने पार पाडली आहे. विशेष म्हणजे, भारतातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये मक्कीचा थेट हात असायचा.

टेरर फंडिंग प्रकरणात 6 महिन्यांची शिक्षा हाफिज सईदचा मेहुणा मक्की, याला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने 2020 मध्ये टेरर फंडिंग प्रकरणात 6 महिन्यांची शिक्षा सुनावली होती. टेरर फंडिंग प्रकरणात शिक्षा सुनावल्यानंतर मक्कीने आपल्या हालचाली कमी केल्या होत्या. दरम्यान, मक्कीवर दहशतवादी वित्तपुरवठा, कट रचणे, षड्यंत्रात सहभाग, लष्कर-ए-तैयबाकडून किंवा त्याच्या पाठिंब्याने दहशतवादी भरती केल्याचा आरोप होता. 

लष्कर-ए-तैयबाचे भारतात मोठे हल्ले 

  • लाल किल्ल्यावर हल्ला: 22 डिसेंबर 2000 रोजी लष्कर-ए-तैयबाच्या 6 दहशतवाद्यांनी लाल किल्ल्यावर घुसून सुरक्षा दलांवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात दोन जवानांसह तीन जण ठार झाले होते. 
  • रामपूर हल्ला: 1 जानेवारी 2008 रोजी 5 दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये सीआरपीएफचे 7 जवान आणि एका रिक्षाचालकाला प्राण गमवावे लागले.
  • 26/11:  मुंबईत लष्कर-ए-तैयबाने सर्वात मोठा दहशतवादी हल्ला केला होता. 10 दहशतवादी अरबी समुद्रामार्गे मुंबईत घुसले आणि त्यांनी अनेक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 175 जणांचा मृत्यू झाला होता.
  • श्रीनगर हल्ला: 12-13 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीनगरच्या करण नगरमधील सीआरपीएफ कॅम्पमध्ये एक आत्मघाती हल्लेखोर घुसले. यावेळी एक जवान शहीद झाला, तर एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता.
  • बारामुल्ला: 30 मे 2018 रोजी बारामुल्लामध्ये लष्कराच्या दहशतवाद्यांनी तीन नागरिकांची हत्या केली होती.

अशा विविध हल्ल्यांमध्ये हाफिज सईद आणि मक्कीचा थेट हात होता. मक्कीला 15 मे 2019 रोजी पाकिस्तान सरकारने अटक केली होती आणि लाहोरमध्ये नजरकैदेत ठेवले होते. आता आज अखेर त्याचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्ला