शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Aamir Liaquat Hussain Death: पाकिस्तानी खासदार आमीर लियाकत यांचा संशयास्पद मृत्यू, तीन लग्नं, घटस्फोटांमुळे आले होते चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 15:12 IST

Aamir Liaquat Hussain Death: पाकिस्तानी खासदार आमीर लियाकत यांचा कराचीमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार ते त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत सापडले. ते ५० वर्षांचे होते.

इस्लामाबाद - पाकिस्तानी खासदार आमीर लियाकत यांचा कराचीमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार ते त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत सापडले. ते ५० वर्षांचे होते. जियो टीव्हीने त्यांच्या नोकराच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. आमिर लियाकत हे हल्लीच दुसऱ्या पत्नीपासून घटस्फोट घेत तिसरं लग्न केल्यानं ते चर्चेत आले होते. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांचा न्यूड व्हिडीओ समोर आल्यानेही वाद झाला होता.

आमीर लियाकत यांचं वय केवळ ५० वर्षे होतं. १९७२ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. आमीर लियाकत यांनी तीन लग्नं केली होती. दुसरी पत्नी तोबा अन्वर हिच्याशी त्यांनी २०१८ मध्ये लग्न केलं होतं. तिला घटस्फोट दिल्यानंतर २०२२ मध्ये त्यांनी दानिया शाह हिच्याशी लग्न केलं होतं.

आमीर लियाकत हे ४९ वर्षांचे तर दानिया शाह ही केवळ १८ वर्षांची असल्याने त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. दरम्यान, हे लग्न फार दिवस चालले नाही. गंभीर आरोप करत दानियाने आमिर लियाकत यांच्यापासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. तिचे नाव दानिया आमिरवरून बदलून दानिया मलिक केले होते. दरम्यान, आमीर लियाकत यांचा एक बेडरुम व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ त्यांच्या  बेडरूममधला होता, त्यामध्ये ते बर्फाचे ड्रग्स(Ice Drugs) घेताना दिसत होते. हा व्हिडिओ लीक झाल्यानंतर त्यांनी पाकिस्तानला अलविदा करण्याची घोषणा केली होती.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानDeathमृत्यूInternationalआंतरराष्ट्रीयPoliticsराजकारण