शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 18:29 IST

हा जगातील ऐतिहासिक क्षण असेल. ४७ वर्षाचा भ्रष्टाचार,  खंडणी आणि मृत्यूचे तांडव अखेर संपेल असं ट्रम्प यांनी म्हटलं.

वॉशिंग्टन - अमेरिका इराण युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. त्यात अमेरिकेने २ दिवसांपूर्वी इराणला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला होता. ज्याची मुदत आता संपत आली आहे. त्यातच राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला सर्वात मोठी धमकी दिली आहे. आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल. जी पुन्हा आणली जाऊ शकत नाही. मला असं करायचं नव्हते परंतु कदाचित हेच होईल असं ट्रम्प यांनी सांगत इराणला धमकी दिली आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 'Truth Social' वर एक पोस्ट केली आहे. त्यात म्हटलंय की, आता इराणमधील सत्ता बदलली आहे. आता तिथे आधीपेक्षा कमी कट्टरपंथी आणि स्मार्ट लोक आलेत. ते काही क्रांतीकारी पाऊल उचलतील का हे माहिती नाही. आज रात्री सगळं कळेल. हा जगातील ऐतिहासिक क्षण असेल. ४७ वर्षाचा भ्रष्टाचार,  खंडणी आणि मृत्यूचे तांडव अखेर संपेल. ईश्वर महान आहे, त्यांची इराणी जनतेवरील कृपा कायम राहील असं ट्रम्प यांनी म्हटलं.

डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अशावेळी समोर आले आहे जेव्हा एक दिवस आधी ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत इराणमध्ये अडकलेल्या अमेरिकन पायलट यांच्या रेस्क्यू ऑपरेशनची माहिती दिली. ट्रम्प यांनी इराणला होर्मुझ खुला करून डील करण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली होती. जी आता काही तासांनी संपेल. सुरुवातीला ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांची मुदत दिली होती आणि त्या वेळेत सामुद्रधुनी खुली न केल्यास हल्ल्याचा इशारा दिला होता. मात्र जग या संघर्षाच्या निकालाची वाट पाहत असताना ट्रम्प यांनी तणाव कमी केला आणि मुदतवाढ दिली. आतापर्यंत ट्रम्प यांनी तीन वेळा मुदतवाढ दिली असून ही नवीन मुदत ८ एप्रिल रोजी संपत आहे. पहिला इशारा ४८ तासांचा होता, जो नंतर पाच दिवसांनी आणि त्यानंतर आणखी १० दिवसांनी वाढवण्यात आला. अशाप्रकारे मूळ ४८ तासांची मुदत आता एकूण ४०८ तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

अमेरिका-इस्रायलचे हल्ले सुरू

दरम्यान, ट्रम्प  यांनी दिलेली डेडलाइन संपायला काही तास शिल्लक असताना इस्रायल अमेरिकेने इराणवरील हल्ले वाढवले आहेत. त्यात इराणी सरकारने ट्रेनची सेवा थांबवली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात शहरातील अनेक मोठे पूल उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. इराणमधील तबरेज जांजन हायवेवरील एक ब्रिज उडवण्यात आला आहे. त्याशिवाय काशान रेल्वे पुलावरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात इस्रायलने दिलेल्या ट्रेन हल्ल्याच्या इशाऱ्यामुळे इराणमधील रेल्वे वाहतूक अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Warns Iran: Civilization's End Tonight?

Web Summary : Trump issued a stark warning to Iran, hinting at potential regime change and cultural demise. He cited corruption and hinted at action. US-Israel increased attacks; Iranian train service halted.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराण