शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

६० सेकंदांचे थरारक ऑपरेशन, तारीख २८ फेब्रुवारी शनिवार, वेळ सकाळी ८.१० मिनिटे आणि इराणच्या सर्वोच्च नेत्याचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 05:44 IST

इराणच्या सर्व बड्या नेत्यांवर सीआयए-मोसादची अनेक महिन्यांपासून होती पाळत  मोसाद-सीआयएदरम्यान झाले माहितीचे आदान-प्रदान  इराणच्या प्रत्येक लष्करी हालचालींचा घेतला जात होता मागोवा  इराणच्या कानाकोपऱ्यात इस्रायल-अमेरिकेने पेरले होते शेकडो खबरे, हस्तक  अमेरिकेने खामेनेई घटनास्थळी आल्याची अचूक माहिती दिली आणि इस्रायलने खामेनेईंच्या कंपाऊंडवर सुमारे ३० क्षेपणास्त्रे/बॉम्ब डागले  खामेनेईंसह त्यांचे कुटुंबीय अन् ४० जण ठार

वॉशिंग्टन : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (८६) यांच्यासह वरिष्ठ इराणी नेत्यांच्या हालचालींवर इस्रायली आणि अमेरिकन अधिकाऱ्यांनी अनेक आठवडे पाळत ठेवली होती. या माहितीच्या आधारेच भरदिवसा अचानक हल्ला करून इराणला धक्का देणे शक्य झाले, अशी माहिती एका इस्रायली लष्करी अधिकाऱ्याने आणि या मोहिमेची माहिती असलेल्या एका व्यक्तीने दिली. अमेरिकेची गुप्तहेर संघटना सीआयएनेही अनेक महिन्यांपासून इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या हालचालींचा मागोवा घेतला होता. इस्रायलच्या लष्करी अधिकाऱ्याने रविवारी सांगितले की, खामेनेई २८ फेब्रुवारीला त्यांच्या निवासस्थानी एक बैठक घेणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार २८ फेब्रुवारीला सकाळी ८.१० मिनिटांनी हे ऑपरेशन सुरू झाले आणि केवळ एका मिनिटाच्या अंतरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन मोठे हल्ले करण्यात आले. हे हल्ले इतक्या वेगाने झाले की, ते एकाच वेळी झाल्यासारखे वाटले. यामध्ये खामेनेई  त्यांच्या कुटुंबीयांसह रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख व देशाचे संरक्षणमंत्र्यांसह सुमारे ४० वरिष्ठ नेते जागीच ठार झाले. 

खामेनेईंच्या मृतदेहाचा फोटो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना दाखवला. इस्रायलने एखाद्या राष्ट्रप्रमुखाला मारण्याची ही पहिलीच घटना  आहे.

सीआयए-मोसादने मोहिमेची रणनीती कशी आखली?इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादने इराणमध्ये गेल्या २० वर्षांपासून आपल्या खबऱ्यांचे, हस्तकांचे मोठे जाळे इराणमध्ये पसरवलेले आहे. या हस्तकांना अत्याधुनिक उपकरणे देण्यात आली आहेत. तर अमेरिकेची गुप्तहेर संघटना सीआयएने गेल्या सहा महिन्यांत सॅटेलाईट डेटा आणि कम्युनिकेशन इंटरसेप्शन (फोन टॅपिंग) द्वारे खामेनेईंच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते.

दिवसा हल्ला करून दिला धक्काअशा महत्त्वाच्या कारवाया, ऑपरेशन्स सहसा रात्रीच्या अंधारात केल्या जातात, पण शत्रूला गाफील ठेवण्यासाठी 'डे-लाइट अटॅक' (भरदिवसा हल्ला) करण्यात आला. हा एक धोरणात्मक धक्का होता, ज्याची अपेक्षा इराणी सुरक्षा दलांना नव्हती.अचूक माहिती अन् ६० सेकंदांचा थरारइराणचे खामेनेईबरोबर अन्य वरिष्ठ नेते ज्या इमारतीत बैठकीसाठी आले होते. त्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर कारवाईला हिरवा सिग्नल देण्यात आला. ही कारवाई इतकी अचूक आणि वेगवान होती की, अवघ्या ६० सेकंदांच्या आत एकापाठोपाठ एक शक्तीशाली रॉकेटद्वारे हल्ले बैठक सुरू असलेल्या इमारतीवर करण्यात आले. या एका मिनिटाच्या कालावधीत खामेनेई त्यांच्या कुटुंबातील सदस्यासह इराणच्या सुरक्षा यंत्रणेतील वरिष्ठ नेते  असे ४० महत्त्वाचे अधिकारी मारले गेले. पहिल्या हल्ल्यानंतर नेत्यांना पळून जाण्याची संधी मिळू नये, यासाठी अवघ्या ६० सेकंदात तीन ठिकाणी जोरदार हल्ले करण्यात आले. 

खामेनेईंना मारल्यानंतर प्रश्न मिटला का?काही ज्येष्ठ राजनयिक आणि सामरिक तज्ज्ञांच्या मते एखाद्या प्रभावशाली नेत्याला मारल्याने विचारधारा संपत नाही. हमास आणि हिजबुल्ला संघटनेत एक नेता मारला गेला की त्याची जागा दुसरा घेतो. सीआयएच्या एका अनुभवी अधिकाऱ्यानेही याला 'धोरणात्मक चूक' म्हटले आहे, कारण नेत्याची हत्या केल्याने प्रश्न सुटण्याऐवजी नवीन समस्या निर्माण होतात.

'गोल्डन चान्स' कसा मिळाला?इस्रायली गुप्तचरांनी अनेक वर्षांपासून खामेनेईंच्या दैनंदिन जीवनचर्येचा सखोल अभ्यास केला होता. ते कोणाला भेटतात, ते काय खातात, त्यांचे नातेवाईक कोण आहेत, ते कचरा कुठे टाकतात, कोणाला फोन करतात, इथपर्यंतची माहिती इस्रायलने गोळा केली होती. शनिवारी सकाळी तेहरानमधील एका गुप्त ठिकाणी इराणच्या सर्वोच्च नेत्यांची बैठक होणार असल्याची पक्की माहिती सीआयएने इस्रायलला दिली आणि त्याच क्षणी हल्ला करण्याचे ठरले.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's Supreme Leader Khamenei Assassinated in 60-Second Operation: Report

Web Summary : Israeli and US intel agencies tracked Khamenei for weeks. A swift, daylight attack on February 28th killed him and 40 others. The operation, planned by CIA and Mossad, used precise intel and rapid strikes within 60 seconds.
टॅग्स :Iranइराणwarयुद्धAmericaअमेरिकाIsraelइस्रायल