शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
4
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
5
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
6
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
7
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
8
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
9
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
10
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
11
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
12
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
13
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
14
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
15
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
16
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
17
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
18
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
19
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
20
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

Afghanistan earthquake: हातांनी ढिगारे उपसून वाचविले प्राण, अफगाणिस्तानला दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 06:27 IST

Afghanistan earthquake: अफगाणिस्तानच्या पूर्व भागात झालेल्या भीषण भूकंपात हजारांहून अधिक लोक ठार झाले. अनेक लोक कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी जिवंत राहिलेल्या लोकांनी आपल्या हाताने ढिगारा उपसून आपले प्राण वाचविले.

गयान : अफगाणिस्तानच्या पूर्व भागात झालेल्या भीषण भूकंपात हजारांहून अधिक लोक ठार झाले. अनेक लोक कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी जिवंत राहिलेल्या लोकांनी आपल्या हाताने ढिगारा उपसून आपले प्राण वाचविले. या आपत्तीनंतर अफगाणिस्तानमध्ये दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. त्याची ४.३ रिश्टर तीव्रता होती. या देशातील भूकंपग्रस्तांच्या बचावकार्यासाठी तालिबान राजवटीने फारसे काहीही केलेले नाही. ते आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मदत स्वीकारतील का याबद्दलही अनिश्चितता आहे. पक्तिया प्रांतातील गयान जिल्ह्याला बुधवारच्या भूकंपाचा मोठा तडाखा बसला आहे. त्यामुळे कोसळलेल्या घरांच्या ढिगाऱ्यातून आपल्या संसाराच्या उरलेल्या वस्तू लोक गोळा करत आहेत. जे या भूकंपातून वाचले ते आपल्या सगेसोयऱ्यांचे मृतदेह ढिगाऱ्यांखालून काढण्याच्या प्रयत्नात आहेत. अफगाणिस्तानमध्ये गेल्या दोन दशकांत झालेला हा सर्वात भीषण भूकंप आहे. त्यात १५००हून अधिक जण जखमी झाले. अमेरिकी व दोस्त राष्ट्रांच्या फौजा अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्यानंतर तालिबानींनी तिथे सत्ता काबीज केल्याच्या घटनेस १० महिने उलटले आहेत. मात्र या कालावधीत तेथील बेकारी, गरिबीची समस्या कमी झालेली नाही. त्यातच या भूकंपाचे संकट उद्भवल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. जुनी घरे भूकंपात कोसळली. मात्र आधुनिक इमारतींनी टिकाव धरला आहे. (वृत्तसंस्था)

पाकिस्तानचे ३० जण ठार : अफगाणिस्तानमधील भूकंपात पाकिस्तानमधील मदखेल आदिवासी जमातीचे ३० जण मरण पावले आहेत. २०१४ साली झालेल्या लष्करी कारवाईच्या वेळी हे लोक अफगाणिस्तानमध्ये पळून गेले होते. उत्तर वझिरिस्तानातील हे मूळ रहिवासी आहेत.  

दरवर्षी २० हजार भूकंपाचे धक्केदरवर्षी जगात २० हजार भूकंपाचे धक्के बसतात. त्यातील १०० भूकंपाचे धक्के तीव्र क्षमतेचे असतात. त्यांच्यामुळे नुकसान होते, अशी माहिती नॅशनल अर्थक्वेक इन्फर्मेशन सेंटरने दिली. जगाच्या इतिहासात सर्वात जास्त वेळेचा भूकंप २००४ साली हिंद महासागरात झाला होता.  त्याचे धक्के १० मिनिटे बसत होते.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानEarthquakeभूकंप