शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानचे ‘खायला नाही दाणा, अन्..’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 06:58 IST

महागाई, आर्थिक तंगीतही अण्वस्त्रसाठा वाढवण्यावर भर, पाकिस्तान लष्कराच्या बेसकॅम्पवर त्यासाठी प्रक्षेपकही बसवण्यात आल्याचे उपग्रह छायाचित्रांमध्ये दिसत असल्याचे अहवालात म्हटले.

इस्लामाबाद : पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामना करत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचा रोष वाढला असताना, मात्र पाकिस्तान सरकार अण्वस्त्रांचा साठा वाढवत असल्याचे फेडरेशन ऑफ अमेरिकी सायंटिस्टच्या अहवालातून उघड झाले आहे.

पाकिस्तान लष्कराच्या बेसकॅम्पवर त्यासाठी प्रक्षेपकही बसवण्यात आल्याचे उपग्रह छायाचित्रांमध्ये दिसत असल्याचे अहवालात म्हटले.सध्या पाकिस्तान ४ नव्या प्लुटोनियम रिॲक्टरही काम करत आहे, तसेच युरेनियम आण्विक प्रकल्पाची क्षमताही वाढवली जात आहे. नव्या शस्त्रास्त्रांच्या निर्मितीसाठी अधिकाधिक कच्चा माल गोळा करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील असल्याचे अहवालात म्हटले आहे. पाककडून वर्षभरात किमान १४-२७ शस्त्रास्त्रे आणि ५-१० नवी अण्वस्त्रे तयार करण्यात येत आहेत.

पाकिस्तानात पेट्रोेल ३३१ रुपयांवर

पाकिस्तानमधील काळजीवाहू सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये भरमसाट वाढ केली आहे. त्यामुळे त्या देशात पेट्रोल प्रतिलिटर दर ३३१.३८ रुपये झाले. हायस्पीड डिझेलचे दर प्रतिलिटर ३२९.१८ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या दोन्ही इंधनाचे दर प्रतिलिटर ३३० रुपयांहून अधिक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या महिनाभरात पेट्रोल, डिझेलच्या दरात अनुक्रमे ५८.४३ रुपये, ५५.८३ रुपये इतकी वाढ झाली आहे. 

१७० अण्वस्त्रेपाकिस्तानच्या ताफ्यात सध्या १७० अण्वस्त्रे असून २०२५ पर्यंत ही संख्या २०० पर्यंत पोहोचण्याची शक्यता अमेरिकन आण्विक वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.

कुठे ठेवतात अण्वस्त्रे ? पाकिस्तानने त्यांच्या लष्करी आणि हवाईदलाच्या किमान ५ तळांवर अण्वस्त्रे ठेवण्याची व्यवस्था केली आहे. कराचीच्या मसरूर एअरबेसवरही अनेक अण्वस्त्रे ठेवली आहेत. त्याशिवाय मिन्हास कामरा, शहबाज एअरबेसवरही शस्त्रसाठा ठेवला आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान