शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कबरीच कबरी...! इराणवर दुःखाचा डोंगर, खोदल्या जातायत शेकडो कबरी! परराष्ट्र मंत्र्यांनी गाझाचा उल्लेख करत शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 17:44 IST

हा भीषण हल्ला शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी दक्षिण इराणमधील मिनाब शहरातील 'शाजारेह तैबेह' या मुलींच्या प्राथमिक शाळेवर झाला होता.

अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यांनंतर इराणवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. इराणमध्ये सध्या अत्यंत विदारक आणि हृदयद्रावक परिस्थिती निर्माण झाली आहे. युद्धाच्या पहिल्याच दिवशी १६० हून अधिक निष्पाप शाळकरी मुलींना आपला जीव गमवावा लागला. यामुळे संपूर्ण इराण दुःखाद बुडाला आहे.

इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये, हजारो लोक मृत विद्यार्थिनींच्या अंत्यसंस्कारासाठी एकत्र आल्याचे दिसत आहे. दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. पुरुष लोकही धाय मोकलून रडताना दिसत आहेत. यावेळी काहींच्या हातात सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचे फोटो, तर काहींच्या हातात इराणचा राष्ट्रध्वज दिसत आहे.

२८ फेब्रुवारीला झाला होता हा भीषण हल्ला -हा भीषण हल्ला शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी दक्षिण इराणमधील मिनाब शहरातील 'शाजारेह तैबेह' या मुलींच्या प्राथमिक शाळेवर झाला होता. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, कोणत्याही शिक्षण संस्था, रुग्णालय किंवा सार्वजनिक ठिकाणांवर जाणीवपूर्वक हल्ला करणे हा 'युद्ध गुन्हा' (War Crime) मानला जातो.

कबरींचा फोटो शेअर परराष्ट्र मंत्र्यांचा ट्रम्प यांच्यावर निशाणा -इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर मुलींना दफन करण्यासाठी खोदल्या जात असलेल्या सामूहिक कबरींचा फोटो शेअर करत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या घटनेला 'कोल्ड ब्लडेड मर्डर' असे म्हटले आहे. 

अराघची यांनी लिहिले, "अमेरिका-इस्रायली बॉम्बस्फोटात मारल्या गेलेल्या १६० हून अधिक निष्पाप तरुणींसाठी या कबरी खोदल्या जात आहेत. त्यांच्या शरिराचे तुकडे-तुकडे करण्यात आले. मिस्टर ट्रम्प यांनी ज्या "बचावा"चे वचन दिले होते, ते प्रत्यक्षात असे दिसते. गाझापासून मिनाबपर्यंत निष्पापांच्या निर्घृण हत्या करण्यात आल्या."

 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Mourns: Mass Graves Dug After School Bombing, Accusations Fly.

Web Summary : Iran reels after a school bombing killed over 160 girls. Mass graves are being dug. Iranian officials blame US and Israel, citing a 'cold-blooded murder' from Gaza to Minab.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिकाDeathमृत्यू