शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

वडील, नवरा, रॉस फोर्ड... आणि एक पुस्तक; ४० वर्षापूर्वीची जुनी आठवणी पुन्हा ताजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 11:10 IST

हे पुस्तक मुळात १९३२ साली प्रकाशित झालं होतं. बऱ्यापैकी लोकप्रिय असणाऱ्या त्या पुस्तकाच्या आजवर अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत

पुस्तकांवर प्रेम करणारी माणसं जगभर सगळीकडे असतात. ही माणसं आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगी पुस्तकं भेट देतात. एखाद्या प्रसंगी, एखाद्या व्यक्तीला कुठलं पुस्तक भेट द्यावं, याची त्यांना समज असते. त्यांना तेवढी माहिती असते. त्यांनी अनेकदा स्वतः खूप पुस्तकं वाचलेली असतात किंवा निदान पुस्तकांबद्दल खूप वाचलेलं असतं. त्यांना आवडलेलं, किंवा महत्त्वाचं वाटलेलं पुस्तक ते कुठूनही मिळवून आणतातच. मग ते प्रत्यक्ष दुकानात जाऊन आणायचं असू दे किंवा ऑनलाइन ऑर्डर करायचं असू दे! 

इंग्लंडमधील ईस्ट ससेक्स परगण्यात राहणाऱ्या रॉस फोर्ड नावाच्या बाईंनी नुकतंच त्यांच्या नवऱ्यासाठी अल्ड्स हक्सले नावाच्या लेखकाचं टेक्सट्स अँड प्रीटेक्सट्स नावाचं पुस्तक ऑर्डर केलं. ते पुस्तक  घरी आलं, त्यांनी ते उघडून बघितलं आणि त्यांना आनंदाश्चर्याचा धक्काच बसला. कारण ते पुस्तक त्यांनीच त्यांच्या वडिलांना चाळीस वर्षांपूर्वी भेट दिलं होतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीने दोनवेळा तेच पुस्तक विकत घ्यायचं ठरवलं, तर तिला त्याच आवृत्तीची प्रत मिळेल, याचीही शाश्वती नसते; पण या रॉस फोर्ड बाईंना मात्र त्यांनी वडिलांना भेट दिलेलीच प्रत पुन्हा विकत मिळाली. 

झालं होतं असं, की फोर्ड बाईंनी १९८४ साली हे पुस्तक त्यांच्या वडिलांसाठी विकत घेतलं होतं. त्या सांगतात, “माझे वडील त्यावेळी सेवानिवृत्त होत होते. त्यावेळी मला असं वाटलं की, त्यांना आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा आणि छान दृष्टिकोन देणारं काहीतरी द्यावं. त्यावेळी मला या पुस्तकाचं नाव सुचलं. आणि मी ते त्यांना भेट दिलं.” हे पुस्तक मुळात १९३२ साली प्रकाशित झालं होतं. बऱ्यापैकी लोकप्रिय असणाऱ्या त्या पुस्तकाच्या आजवर अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. बरं, इंग्लिश पुस्तकांच्या आवृत्याही मोठ्या असतात. कित्येकवेळा एक आवृत्ती दहा हजार किंवा पन्नास हजार पुस्तकांची देखील असू शकते. 

असं पुस्तक वडिलांना भेट दिल्यानंतर रॉस फोर्ड त्या पुस्तकाबद्दल विसरूनही गेल्या होत्या; मात्र आता त्यांच्या नवऱ्याचा ८३वा वाढदिवस जवळ आला होता. त्यात त्यांनी एका वृत्तपत्रात काहीतरी असं वाचलं ज्यामुळे त्यांना पुन्हा एकदा त्याच पुस्तकाची आठवण झाली. यावेळी रॉस फोर्डना वाटलं, की हे पुस्तक एखाद्या सेकंडहँड पुस्तकांच्या ऑनलाइन दुकानातून विकत घ्यावं.

त्यानुसार त्यांनी ABE बुक्स या ऑनलाइन पुस्तकांच्या वेअरहाऊसमध्ये या पुस्तकासाठीची मागणी नोंदविली. त्या वेअरहाऊसच्या अंतर्गत यंत्रणेनुसार त्यांची ती ऑर्डर कॅम्ब्रियामधील व्हाइट हॅवन इथे असणाऱ्या मायकेल मून यांच्या दुकानात नोंदविली गेली. हे दुकान रॉस फोर्ड यांच्या घरापासून शेकडो किलोमीटर्स दूर होतं. त्यांनी पुस्तकाची ऑर्डर मिळाल्यावर त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सेकंडहँड प्रतींपैकी एक प्रत रॉस फोर्ड यांना पाठवून दिली.

ती प्रत घरी आल्यावर उघडून बघितल्यावर रॉस बाईंना दिसलं, की त्या प्रतीच्या पहिल्या पानावर कोणाच्या तरी हस्ताक्षरात काहीतरी लिहिलेलं आहे. ते काय लिहिलेलं आहे, हे बघायला गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की तो संदेश कोणीतरी कोणाला तरी उद्देशून लिहिला आहे. साहजिकच तो संदेश त्यांनी वाचला आणि त्यांच्या लक्षात आलं की, चाळीस वर्षांपूर्वी त्यांनीच तो संदेश त्यांच्या वडिलांसाठी लिहिला होता. 

“मी जेव्हा वडिलांना ते पुस्तक भेट दिलं त्यावेळी मला असं वाटलं की, त्यावर आपण काहीतरी लिहून द्यावं. म्हणून मी तो संदेश लिहिला होता आणि त्या संदेशामुळेच मला हे ओळखू आलं की, हे तेच पुस्तक आहे, जे मी माझ्या वडिलांना भेट दिलं होतं.” टेक्सट्स अँड प्रीटेक्सट्स या पुस्तकाच्या जगात अक्षरशः हजारो प्रती असतील. त्यातून नेमकी तीच प्रत दोनवेळा आपल्या हाती लागावी, याचं रॉस बाईंना आश्चर्य वाटलं यात काही नवल नाही. योगायोग घडण्याची ही परिसीमा आहे. हे पुस्तक आपल्या वडिलांनी हाताळलं होतं, ही भावनाच त्यांच्यासाठी किती सुखावणारी असेल, याची कोणीही कल्पना करू शकतं. रॉस बाई म्हणतात, “या घटनेने माझ्या आयुष्यातील एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं मला वाटतं आहे. आणि माझ्या भाग्यात एकच पुस्तक दोनवेळा विकत घेणं लिहिलेलं आहे.”

सेकंडहँड सुखाचा योगायोगएखादी वस्तू आपण नवीन घेऊ शकत असतानाही ती सेकंडहँड दुकानातून घेण्यातील हा एक अदृश्य फायदाच म्हणायचा. प्रत्येक वापरलेल्या वस्तूशी कोणाची ना कोणाची काही तरी आठवण जोडलेली असते. काही जणांना योगायोगाने स्वतःचीच आठवण जोडली गेलेली एखादी वस्तू या प्रकारच्या दुकानात मिळू शकते. जशी रॉस फोर्ड बाईंना मिळाली.

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडी