शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खास प्लॅन...! भारत-बांगलादेशमधील कटुता दूर होणार? होऊ शकते जयशंकर-मोहम्मद तौहिद हुसेन यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 19:57 IST

जर तौहीद हुसेन आणि एस जयशंकर यांची नियोजित बैठक झाली, तर पाच महिन्यांतील ही त्यांची दुसरी बैठक असेल...

बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहिद हुसेन पुढील आठवड्यात ओमानची राजधानी असलेल्या मस्कट येथे आयोजित हिंद महासागर परिषदेदरम्यान भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेऊ शकतात. बांगलादेश, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये आणखी तणाव वाढू नये या उद्देशाने, एक संदेश देण्यासाठी या बैठकीचा वापर करू शकतो.

8 वी हिंद महासागर परिषद (आयओसी 2025) 16-17 फेब्रुवारीला मस्कट येथ होत आहे. भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी गेल्या महिन्यात बांगलादेशच्या परराष्ट्र सल्लागारांना परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे. जर तौहीद हुसेन आणि एस जयशंकर यांची नियोजित बैठक झाली, तर पाच महिन्यांतील ही त्यांची दुसरी बैठक असेल.

यापूर्वी सप्टेंबर महिन्यात झाली होती बैठक -यापूर्वी, तौहीद हुसेन आणि एस जयशंकर यांची बैठक गेल्या वर्षी सप्टेंबरमहिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या सत्रादरम्यान न्यूयॉर्क येथे झाली होती. बांगलादेशात विद्यार्थी आणि जनतेने केलेल्या उठावामुळे ५ ऑगस्टला शेख हसीना यांचे अवामी लीग सरकार कोसळले होते. यानंतर,ची ही चर्चा परस्पर हितांच्या मुद्द्यांवर द्विपक्षीय संबंध पुढे नेण्यासंदर्भात झाली होती. 

भारतीय परराष्ट्र सचिवांनी केला होता बांगलादेश दौरा -न्यू यॉर्क येथील चर्चेनंतर, भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ढाका दौरा केला होता. यावेळी त्यांनी बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मोहम्मद जसीम उद्दीन यांची भेट घेतली होती. याशिवाय त्यांनी, बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मुहम्मद युनूस, परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसेन आणि लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांचीही भेट घेतली. तेव्हा दोन्ही देशांत संबंध सामान्य करण्यासंदर्भात आणि ऑगस्टनंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. महत्वाचे म्हणजे, बांगलादेशातील सत्तापालटानंतर शेख हसीना देखील भारतात आहेत. यामुळेही दोन्ही देशांचे संबंध बिघडलेले आहेत.   बांगलादेशने अनेक वेळा त्यांना परत पाठविण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतS. Jaishankarएस. जयशंकर