शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

८० टक्के भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खूश, पीइडब्ल्यूच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 06:33 IST

दिल्लीत ९ व १० सप्टेंबर रोजी होत असलेल्या जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले.

वॉशिंग्टन : भारतातील ८० टक्के नागरिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अनुकूल मत आहे. तर अलीकडच्या काळात भारत हा अधिक प्रभावशाली देश झाला असल्याचे दर दहापैकी सात भारतीयांचे मत आहे, असा निष्कर्ष पीइडब्ल्यू रिसर्च सेंटरने केलेल्या एका सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. 

दिल्लीत ९ व १० सप्टेंबर रोजी होत असलेल्या जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. भारताबद्दल जगभरात सकारात्मक प्रतिक्रिया आहे असे या सर्वेक्षणातून दिसून आले. ४६ टक्के लोकांनी भारताबद्दल अनुकूल तर ३४ टक्के लोकांनी प्रतिकूल मत व्यक्त केले. तर १६ टक्के लोकांनी मतप्रदर्शन करण्यास नकार दिला.

पीइडब्ल्यू या संस्थेने २० फेब्रुवारी ते २२ मे या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणात २४ देशांतील ३०,८६१ जण सहभागी झाले. त्यात भारतातील २६११ नागरिकांचा समावेश होता. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत हा महाशक्ती बनण्याची शक्यता कितपत आहे तसेच भारतीयांना इतर देशांबद्दल काय वाटते, या गोष्टींबाबत सदर सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आले होते.

मोदी यांची लोकप्रियता कायम : भाजपपीइडब्ल्यूच्या सर्वेक्षणातील निष्कर्षांबद्दल भाजपने म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम आहे. भारताचा जागतिक स्तरावरील प्रभाव वाढत आहे असे भारतातील सर्वाधिक लोकांना तसेच साऱ्या जगालाही वाटते. पीइडब्ल्यूच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष हा त्याचा पुरावा आहे. 

१० पैकी ७ भारतीयांना वाटते की, भारत झाला आहे अधिक प्रभावशाली देश.

१० पैकी ८  भारतीयांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी अनुकूल मत

७१%इस्रायली नागरिकांचा भारताविषयी सकारात्मक दृष्टिकोन  असल्याचे अहवालात म्हटले आहे.

४९% भारतीयांना वाटते की अमेरिकेचा प्रभाव वाढला आहे

४१% भारतीयांना वाटते की रशियाचा प्रभाव वाढला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा