शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

‘प्रेमापोटी’ ७७ वर्षीय नवऱ्याला घातली गोळी! अमेरिकेतील वृद्ध दाम्पत्याची थरारक कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 09:27 IST

अमेरिकेतील एक वृद्ध दाम्पत्य. पती जेरी जिलँड ७७ वर्षांचा, तर त्याची पत्नी एलन ७६ वर्षांची.

अमेरिकेतील एक वृद्ध दाम्पत्य. पती जेरी जिलँड ७७ वर्षांचा, तर त्याची पत्नी एलन ७६ वर्षांची. दोघांचंही एकमेकांवर निरतिशय प्रेम. त्यांचं आतापर्यंतचं बरंचसं आयुष्य अतिशय आनंदात आणि समाधानात गेलं. गेल्या काही महिन्यांपासून मात्र जेरी एका दुर्धर आजारानं त्रस्त होता. त्यामुळे या दाम्पत्याच्या आयुष्यातला आनंदच जणू हरपून गेला होता. एलननं अमेरिकेतील फ्लोरिडा येथील ॲडव्हेन्ट हेल्थ हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केलं होतं. जेरीचा आजार बरा होईल आणि तो पुन्हा हिंडा-फिरायला लागेल, असं दोघांनाही वाटत होतं, पण नंतर ती शक्यता जवळपास मावळली. वेदना असह्य होऊ लागल्यानं जेरीला एकएक दिवस काढणंही मुश्कील होऊ लागलं. 

त्याचं आजारपण पाहून पत्नी एलनही दिवसेंदिवस खंगू लागली. शेवटी दोघांनीही एक ‘प्लॅन’ केला. खरं तर या ‘प्लॅन’चा मुख्य सूत्रधार जेरीच होता. त्यानं आपल्या पत्नीला सांगितलं, हे बघ एलन, मी बरा व्हावा, यासाठी तुला जे जे शक्य आहे, ते ते सारं तू आजवर मनापासून, अतीव प्रेमानं केलंस, आताही करते आहेस्. पण माझ्या आजारपणातल्या या वेदना आता मला सहन होत नाहीएत. तुलाही त्या पाहवल्या जात नाहीएत, हे मला स्पष्टपणे दिसतंय. डॉक्टरही त्यांच्याकडून शक्य ते सारे उपचार करताहेत. पण माझ्या आजारात फारसा फरक पडत नाहीए. आज आपल्या दोघांत आपण एक ‘करार’ करू या. आजपासून आणखी बरोब्बर तीन आठवडे आपण वाट पाहू. मीही शरीर-मनानं आणखी कणखर राहण्याचा प्रयत्न करेन. या काळात माझ्या प्रकृतीत थोडा जरी फरक पडला, तरी आपण जिद्दीनं यापुढच्या लढाईला सामाेरे जाऊ, पण.. या काळात माझा आजार जर आणखी बळावला, तर मात्र तू मला गोळी घाल आणि माझ्या वेदना संपव. या साऱ्यातून मला मुक्त कर.. 

जेरीचं बोलणं ऐकल्यानंतर एलनच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. एका शब्दानंही ती काही बोलली नाही, पण त्याच्या या प्रस्तावाला, ‘करारा’ला तिनं नकारही दिला नाही. जणू आपल्या नवऱ्याच्या ‘अखेरच्या इच्छेला’ तिनं मूक संमतीच दाखवली. एक एक दिवस जाऊ लागला. आजारपणाच्या वेदनांचे सारे घाव जेरी जिद्दीनं सोसत होता, एलननंही तिच्या मदतीत, प्रयत्नांत कुठलीच कसर सोडली नाही. ठरल्याप्रमाणे तीन आठवडे उलटले, पण तरीही जेरीच्या प्रकृतीत काडीचाही फरक पडला नाही. त्याच्या वेदनांमध्ये मात्र वाढच झाली होती. जेरीनं करुणपणे आपल्या पत्नीकडे पाहिलं. एलननंही एक निर्धार केला. भरल्या डोळ्यांनी ती उठली. कुठून तरी एक गन पैदा केली. पुन्हा हॉस्पिटलच्या अकराव्या मजल्यावरच्या रूममध्ये ती आली. इथेच जेरीला ठेवण्यात आलं होतं. 

एलन जेरीच्या जवळ आली. त्याला आलिंगन दिलं. प्रेमानं त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं. मन घट्ट केलं. हात स्थिर ठेवण्याचा निर्धारानं प्रयत्न केला. जेरीच्या डोक्यावर तिनं गन ठेवली. दोघांनीही डोळे मिटले. बराच वेळ शांततेत गेला आणि थरथरत्या हातांनी एलननं अखेर ट्रिगर दाबला! जेरी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, पण आता त्याच्या साऱ्या वेदना कायमच्या थांबल्या होत्या...

गनच्या आवाजानं हॉस्पिटलचे कर्मचारी धावून आले. क्षणार्धात पोलिसही हजर झाले. पण एलन जागची हलली नाही. तिच्या हातात गन तशीच होती. अश्रूंचा बांध तसाच फुटलेला होता. ती होती तिथेच, तशीच बसली होती. तिनं तिथून उठायचा किंवा पळून जायचाही प्रयत्न केला नाही. जे काही झालं, ते सर्व हॉस्पिटलच्या अकराव्या मजल्यावरच्या त्या कोपऱ्यातल्या खोलीत..

जेरीच्या मेंदूत गोळी घातल्यानंतर खरंतर तिला स्वत:वरही गोळी झाडायची होती. तिचं स्वत:चं आयुष्यही तिला संपवायचं होतं, कारण जेरी आणि एलनमध्ये तसाच ‘करार’ झाला होता, पण ती तसं करू शकली नाही.. कारण त्यानंतर तिचं देहभान सारं काही हरपलं.. तिच्या थरथरत्या हातात गन तशीच होती आणि डोळ्यांतल्या गंगाजमुनांना अक्षरश: पूर आलेला होता.

तिनं स्वत:ला मात्र गोळी घातली नाही!काहीही धोका नको म्हणून पोलिसांनी लगेच इतर साऱ्या पेशंट्सना सुरक्षित ठिकाणी हलवलं. एलनला हातातली गन खाली टाकायला सांगितली. पण एलन अजूनही हातात गन घेऊन तशीच बसलेली होती. सुन्न.. तिनं स्वत:ला गोळी घातली नाही, पण तिचंही अस्तित्व आता जगासाठी, स्वत:साठी जणू संपलंच होतं. पोलिसांनी एलनला अटक केली, फर्स्ट डिग्री मर्डर केसचा गुन्हा तिच्यावर दाखल केला, पण आता ती या साऱ्या गोष्टींच्या बाहेर गेली आहे. नुकत्याच घडलेल्या या घटनेनं इच्छा-मरणाचा प्रश्न मात्र संपूर्ण जगभरात पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे..