शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

इराणसाठी ७ इस्रायली करत होते हेरगिरी; अण्वस्त्रांपासून लष्करी तळांची माहिती दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 14:27 IST

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटाेनी ब्लिंकन हे इस्रायलमध्ये शस्त्रसंधीच्या चर्चेसाठी दाखल झाले आहेत

तेल अवीव : इराणसाठी हेरगिरी करण्याच्या आराेपावरून इस्रायलच्या ७ नागरिकांना अटक करण्यात आली असून, ते गेल्या २ वर्षांपासून इराणसाठी हेरगिरी करीत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे इराणने इस्रायलमध्ये हल्ले केले असून, त्यांना हेरगिरीच्या आराेपात मृत्युदंडाचीही शिक्षा हाेऊ शकते. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटाेनी ब्लिंकन हे इस्रायलमध्ये शस्त्रसंधीच्या चर्चेसाठी दाखल झाले आहेत.

इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे सर्व आराेपी उत्तर इस्रायलमध्ये राहणार आहेत. त्यांच्यामध्ये एका माजी सैनिकाचा समावेश असून, ताे काही वर्षांपूर्वी सैन्यातून पळून गेला हाेता. याशिवाय दाेन अल्पवयीन मुलांचाही त्यात समावेश आहे.

हिजबुल्लाहच्या मुख्य प्रवक्त्याने नेतन्याहू यांच्या निवासस्थानाला लक्ष्य केलेल्या ड्रोन हल्ल्यामागे त्यांचा गट होता, हे मान्य केले आहे. दरम्यान, इस्रायलने लेबनानमध्ये केलेल्या हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

दाेन वर्षांत ६०० माेहिमा

  • हेरगिरीच्या आराेपांवरून अटक करण्यात आलेल्यांनी गेल्या दाेन वर्षांत ६०० पेक्षा जास्त माेहिमा पूर्ण केल्या. पैशांच्या लाेभापायी ते इराणसाठी गाेपनीय माहिती गाेळा करीत हाेते.
  • इस्रायलच्या लष्करी छावण्या, अण्वस्त्रे, दारूगाेळा इत्यादींची माहिती त्यांनी इराणला दिली आहे. माहितीच्या आधारेच इराणने इस्रायलमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
  • फुग्यांद्वारे काढले फाेटाे
  • गॅलिली येथील हवाई तळाचे फुग्यांच्या मदतीने फाेटाे काढण्यात आले हाेते. सर्व आराेपी तुर्कीच्या एका मध्यस्थाच्या संपर्कात हाेते.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायल