बांगलादेशातील मयमनसिंह जिल्ह्यात एका हिंदू तरुणाची जमावाने हत्या केल्याच्या घटनेनंतर, आता सात जणांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी माहिती दिली. तसेच, गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असेही म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात मारल्या गेलेल्या तरुणाचे नाव दीपू चंद्र दास असे होते. तो २७ वर्षांचा होता.
RAB कडून सात संशयितांना अटक -सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर माहिती देताना मोहम्मद युनूस यांनी सांगितले की, दीपूची बेदम मारहाण करून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर 'रॅपिड ॲक्शन बटालियन'ने (RAB-14) मयमनसिंहच्या विविध भागात समन्वित छापे टाकून सात जणांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोहम्मद लिमोन सरकार (१९), मोहम्मद तारिक हुसैन (१९), मोहम्मद माणिक मियां (२०), इरशाद अली (३९), निजुम उद्दीन (२०), आलमगीर हुसैन (३८) आणि मोहम्मद मिराज हुसैन एकॉन (४६) यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अजूनही सुरू आहे.
हादीच्या मृत्यूनंतर भडकलेल्या हिंसाचारादरम्यान घडली घटना - शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतरबांगलादेशात भडकलेल्या हिंसाचारादरम्यानच ही घटना घडली. हादी हा गेल्या वर्षातील ‘जुलै आंदोलना’तील प्रमुख नेते आणि ‘इंकलाब मंच’चा प्रवक्ता होता.
अंतरिम सरकारने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, "दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही", असे मोहम्मद युनूस यांनी म्हटले आहे. सध्या बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना या कारवाईकडे जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Web Summary : Seven arrested in Bangladesh after a Hindu man was lynched. Interim government assures no leniency for culprits. Incident sparked by Hadi's death.
Web Summary : बांग्लादेश में एक हिंदू युवक की हत्या के मामले में सात गिरफ्तार। अंतरिम सरकार ने दोषियों को न बख्शने का आश्वासन दिया। हादी की मौत से भड़की हिंसा।