शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

श्रीलंकेसारखे ६९ देश कंगाल! बेरोजगारी, कर्ज भयंकर वाढल्याने संकटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 06:03 IST

गृहयुद्ध भडकण्याची भीती; बेरोजगारी, कर्ज भयंकर वाढल्याने संकटे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगातील विकसनशील देश कर्जाच्या विळख्यात अडकले असून, यातून बाहेर पडण्याचा त्यांचा मार्ग दिवसेंदिवस कठीण बनत चालला आहे. कर्जाचा बोजा वाढल्याने श्रीलंकेसह जगभरातील तब्बल ६९ देशांवर कंगाल होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

जागतिक बँकेने दिलेल्या माहितीनुसार, लेबनान, ट्यूनिशियासह दोन डझनपेक्षा अधिक देशांत युक्रेन संकट आणि महागाईमुळे वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ, अन्नधान्य टंचाई, बाजारातील घसरणीसह भयंकर बेरोजगारी यामुळे गृहयुद्ध भडकण्याची शक्यता आहे. जगातील अनेक देश विदेशी कर्जाचे हप्ते भरण्यास असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे हे अनेक पिढ्यांमधील सर्वात मोठे कर्जसंकट ठरले आहे. याचा परिणाम भारतावरही होण्याचा धोका आहे. विकसनशील देश कर्जाच्या जाळ्यात अडकून कंगाल होण्याची भीती असल्याचा इशारा जागतिक बँकेने दिला आहे. ७० देशांना यावर्षी ११ अब्ज डॉलरपेक्षा अधिक विदेशी कर्जाचे हप्ते द्यावे लागणार असून, तिजोरी रिकामी असल्याने हे पैसे कुठून आणायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

या देशांना अधिक धोका...इजिप्त : युक्रेन संकटामुळे अन्नधान्याचा तुटवडा, केवळ ३ महिन्यांचा गहू शिल्लकट्यूनिशिया : विदेशी कर्ज देशाच्या जीडीपीपेक्षा १०० टक्केपेक्षा अधिक. महागाई ७ टक्क्यांपेक्षा अधिक. गृहयुद्धाची भीतीलेबनान : बैरुत स्फोटात देशातील सर्वात मोठा धान्याचा साठा नष्ट. अन्नधान्याच्या किमती ११ टक्क्यांनी वाढल्या. चलनाची किंमत ९० टक्क्यांनी घटली. कर्ज जीडीपीपेक्षा ३६० टक्के अधिकअर्जेंटिना : ९ वेळा विदेशी कर्जाचे हप्ते भरण्यास असमर्थ

n अल-सल्वाडोर, पेरू, इथियोपिया, घाना, केनिया, तुर्की आणि दक्षिण आफ्रिकेवर कर्जामुळे कंगाल होण्याची वेळ आली आहे.n या देशांवर विदेशी कर्ज जीडीपीच्या ७० ते १००% इतके वाढले आहे. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांच्याकडे पैसाच शिल्लक नाही. n त्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदतीची याचना केली आहेत.

...यामुळे श्रीलंका बुडालाn राजपक्षे सरकारचे चुकीचे नियोजनn उत्पन्नापेक्षा खर्च अधिक केलाn करामध्ये मोठी सूट दिली, त्यामुळे अर्थव्यवस्था पुरती ढेपाळली. 

...यामुळे जगभरातून मदत मिळेनाn कोरोना महामारीमुळे जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये मंदी. कर्ज घेण्याचा खर्च वाढला, व्याज दर वाढल्याने कर्ज घेणे महागले. n रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यपदार्थ, तेल, धातू महागले. युद्धामुळे पुरवठा साखळी उद्ध्वस्त

 

 

टॅग्स :businessव्यवसायSri Lankaश्रीलंकाInflationमहागाईjobनोकरी