शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

चीनकडून भारताला ६.५० लाख कीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 05:31 IST

भारताकडून ३० लाख कीटस्ची मागणी : १.५ कोटी ‘पीपीई’चीही ऑर्डर; उर्वरित पुरवठा आगामी १५ दिवसांत

बीजिंग : चीनने भारताला गुरुवारी ६,५०,००० मेडिकल कीट पाठविल्या आहेत. बीजिंगमधील भारताचे प्रतिनिधी विक्रम मिस्त्री यांनी ही माहिती दिली. चीनकडून २० लाखांपेक्षा अधिक टेस्ट कीट आगामी १५ दिवसांत भारतात पाठविण्यात येणार आहेत. मिस्त्री यांनी गुरुवारी टष्ट्वीट केले की, रॅपिड अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट आणि आरएनए एक्सट्रॅक्शन कीटसह एकूण ६,५०,००० कीट गुरुवारी ग्वांग्झू विमानतळावरून भारताला पाठविण्यात आले आहेत.

कोरोनाशी अडीच महिने लढल्यानंतर चीनमध्ये कारखाने पुन्हा सुरू झाले आहेत. भारतासह पूर्ण जगात व्हेन्टिलेटर आणि व्यक्तिगत सुरक्षा उपकरणांची (पीपीई) मागणी होत आहे. ही एक संधी म्हणून चीन याकडे पाहत आहे. चीनने या वस्तूंसाठी खासगी आणि सरकारी कंपन्यांना आॅर्डर दिली आहे.भारतात लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक प्रभावित क्षेत्रात टेस्ट वाढविण्याचा हा एक प्रयत्न समजला जात आहे. मिस्त्री यांनी सांगितले की, भारताने ३० लाख कीटसह उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी चीनमधून १.५ कोटी सुरक्षा उपकरणांची आॅर्डर दिली आहे. उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत अनेक देशांनी काळजी व्यक्त केली आहे. याबाबत विचारले असता विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजान यांनी सांगितले की, चीन सरकार गुणवत्तेची काळजी घेत आहे.युरोपमधील मृतांची संख्या ९० हजारांवरपॅरिस : कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या युरोपमध्ये ९० हजारांवर पोहोचली आहे. जगातील ६५ टक्के मृत्यू हे युरोपीय देशांत झाले आहेत, तर १० लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे.अमेरिकेत २४ तासांत २६०० लोकांचा मृत्यूवॉशिंग्टन : अमेरिकेत गत २४ तासांत कोरोनाने २,६०० लोकांचा मृत्यू झाला आहे. एखाद्या देशात २४ तासांत मृत्युमुखी पडणाºया लोकांची ही सर्वोच्च संख्या आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉप्किन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, २४ तासांत २,५६९ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेत मृत्युमुखी पडणाºयांची संख्या २८ हजारांहून अधिक झाली आहे.चीनमध्ये नोव्हेंबरमध्ये पुन्हा संसर्गाची भीती?च्चीनमध्ये आणि अन्य देशात नोव्हेंबरमध्ये पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, अशी भीती चीनमधील एका तज्ज्ञाने व्यक्त केली आहे.च्शांघाई कोरोना टीमचे नेतृत्व करणारे झांग वेंहोंग म्हणाले की, आगामी काही दिवसांत जगातील देश कोरोनावर नियंत्रण मिळवतील; पण नोव्हेंबरमध्ये चीन आणि अन्य देशांत कोरोनाचा संसर्ग पुन्हा होऊ शकतो.च्मोठ्या प्रमाणात टेस्ट करणे आणि संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कातील लोकांना शोधून काढून तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करणे हेच साथ रोखण्याचे प्रभावी माध्यम आहे. 

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या