शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

६८ भारतीयांसह ६४५ हज यात्रेकरूंचा उष्णतेच्या लाटेमुळे मक्का येथे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 10:23 IST

महाझळा : तापमान ५२ अंशांवर; नातेवाइकांची मृतदेह ताब्यात घेण्यासाठी धडपड.

मक्का : हज यात्रेसाठी जगभरातून सौदी अरेबियात आलेल्या लाखो यात्रेकरूंना यंदा उष्णतेच्या महालाटेचा फटका बसत आहे. मक्का आणि या पवित्र शहराच्या परिसरातील तापमान ५२ अंशांवर गेले आहे. झळांनी लाहीलाही व्हावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे गेल्या काही दिवसांमध्ये ६८ भारतीयांसह ६४५ हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उष्माघाताचा त्रास जाणवू लागलेल्या हजारो लोकांना आसपासच्या रुग्णालयांमध्ये दाखल केले जात आहे. 

सौदी अरेबियाने मात्र यात्रेदरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येवर भाष्य केलेले नाही तसेच त्याची कोणतीही कारणे दिली नाहीत. परंतु, शेकडो लोक मक्कामधील अल-मुईसेम परिसरातील आपत्कालीन संकुलात रांगेत उभे होते आणि त्यांच्या बेपत्ता कुटुंबातील सदस्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ऑनलाइन प्रसारित झालेल्या एका यादीनुसार पाच दिवसांच्या हजदरम्यान किमान ६४५ भाविक मरण पावल्याचा दावा करण्यात आला आहे. 

६०० मृतदेह संकुलात यादीतील नावे खरी दिसत आहेत, असा दावा नाव न छापण्याच्या अटीवर एका डॉक्टरने वृत्तसंस्थेकडे केला. किमान ६०० मृतदेह संकुलात आहेत, असा दावा दुसऱ्या एका अधिकाऱ्याने केला. मृतांच्या ऑनलाइन यादीत या भाविकांच्या मृत्यूचे कोणतेही कारण दिले गेले नाही. महाराष्ट्र राज्य हज समितीने स्पष्ट केले की राज्यातील यात्रेकरू सुरक्षित आहेत आणि त्यांना कोणताही त्रास झालेला नाही. 

२०२४ मध्ये  १८ लाखांहून अधिक यात्रेकरूसौदी हज अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार २०२४ मध्ये १८.३ लाखांहून अधिक मुस्लिमांनी हज केले, ज्यात २२ देशांतील १६ लाखांहून अधिक यात्रेकरू आणि सुमारे २ लाख २२ हजार सौदी नागरिक आणि रहिवासी यांचा समावेश आहे.

कडक सुरक्षा व्यवस्थाअल्जेरिया, इजिप्त आणि भारतातील भाविकांचा समावेश असलेल्या मृतांची नावे आणि राष्ट्रीयत्व जाहीर करताना संकुलात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मृतांच्या नातेवाइकांना मृताची ओळख पटविण्यासाठी आत जाण्याची परवानगी देण्यात येत होती. हे मृत्यू नेमके कशामुळे झाले याचे कारण अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेकडे स्पष्ट केले नाही.सौदी अरेबियाने वार्षिक पाच दिवसांच्या हज यात्रेला उपस्थित राहणाऱ्यांची गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा उपायांवर अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत; परंतु, सहभागींची संख्या मोठी असल्याने ते कठीण होते.

काबा प्रदक्षिणेनंतर हज यात्रा पूर्णहज यात्रेकरूंनी मंगळवारी तिसऱ्या दिवशी तीव्र उष्णतेदरम्यान त्यांची यात्रा सुरूच ठेवली. सैतानाला प्रतीकात्मक दगड मारण्याची प्रथा आणि इस्लामचे पवित्र स्थान असलेल्या काबाभोवती प्रदक्षिणा पूर्ण करून यात्रा पूर्ण केली.

टॅग्स :Haj yatraहज यात्राMuslimमुस्लीम