शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

६०० दहशतवादी तळ उद्धवस्त, ४ प्रमुख कमांडर ठार; गाझा पट्टीत इस्रायलची लष्करी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 20:44 IST

Israel Palestine Conflict: गेल्या काही तासांत हमासचे चार प्रमुख कमांडर ठार झाल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण दलाने केला आहे.

गाझा पट्टीत हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध अजूनही सुरु आहे. गाझामध्ये आतापर्यंत ८ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हमासच्या ६००हून अधिक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. इस्रायलचे सैन्य गाझामधील मुख्य शहरात पोहोचले आहे. गाझा सीमेत प्रवेश केल्याच्या सहाव्या दिवशी इस्रायलने शहराच्या पूर्व आणि पश्चिमेकडून रणगाडे आणि प्राणघातक शस्त्रांनी गोळीबार सुरू केला आहे. एवढेच नाही तर बोगद्याच्या आत लपलेल्या दहशतवाद्यांविरोधात स्पंज बॉम्बचा वापर करण्याची तयारी सुरू आहे.

इस्रायलच्या संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, गाझा पट्टीमध्ये जमिनीवर हल्ले तीव्र करण्यात आले आहेत. गाझाच्या प्रत्येक कानाकोपऱ्याचा शोध घेतला जात आहे. तेथे लपलेले दहशतवादी मारले जात आहेत. आतापर्यंत ६०० दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, "आयडीएफच्या सैनिकांनी इमारती आणि बोगद्यांमध्ये अडथळे आणून बसलेल्या जवळपास १२ दहशतवाद्यांना ठार केले. ते आमच्या जवानांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये हमासचे चार प्रमुख आहेत, असे सांगितले जात आहे. 

गेल्या काही तासांत हमासचे चार प्रमुख कमांडर ठार झाल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण दलाने केला आहे. यामध्ये जमील बाबा (हमासच्या सेंट्रल ब्रिगेडमधील नौदल दलाचे कमांडर), मुहम्मद सफादी (तुफा बटालियनमधील अँटी-टँक मिसाईल युनिटचे कमांडर), मुवामन हिजाझी (हमासच्या अँटी-टँक मिसाईल युनिटचे मुख्य ऑपरेटर) आणि मुहम्मद अवदल्लाह (हमास) यांचा समावेश आहे. हमासच्या उत्पादन विभागाचे प्रमुख एका वरिष्ठ ऑपरेटरच्या नावाचा समावेश आहे. यासोबतच हमासने बांधलेले १५० बोगदे आणि बंकरही उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. 

उत्तर गाझा पट्टीमध्ये इस्रायली लष्कराला सर्वात मोठे यश मिळाले आहे. येथील हवाई हल्ल्यात हमासच्या ड्रोन विभागाचा कमांडर असीम अबू रक्का ठार झाला आहे. दिवस-रात्र, सकाळ-संध्याकाळ बॉम्ब पडत आहेत. अलिकडच्या वर्षांत असे विध्वंसाचे दृश्य जगाने क्वचितच पाहिले आहे. गाझामधील विध्वंस एवढा आहे की येथील ४० टक्के इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. ठिकठिकाणी पडक्या इमारतींचे ढिगारे पडले आहेत. पाणी, वीज आणि इंटरनेट सर्व काही खंडित करण्यात आले आहे. लोक आपल्या जीवाची याचना करत आहेत. इस्रायलचे मर्कावा रणगाडे हमासच्या दहशतवाद्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. एवढेच नाही तर इस्रायल पांढर्‍या फॉस्फरस बॉम्बचाही वापर करत आहे.

विरोधानंतरही इस्रायलची लष्करी कारवाई सुरूच-

इस्रायलच्या या हल्ल्याची जगभर चर्चा झाली. अनेक देश या युद्धाच्या विरोधात आहेत. अनेक देशांमध्ये आंदोलनेही होत आहेत, पण त्यामुळे इस्रायलला काही फरक पडत नाही, कारण त्याला फक्त हमासचा नाश करायचा आहे. इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी म्हणाले की, गाझामधील आमच्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही जे काही आवश्यक असेल ते करू. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे स्वतःच्या सैनिकांना भेटून त्यांना प्रोत्साहन देत आहेत.

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध