शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

600 भारतीय कामगारांचा कतारमध्ये छळ, पगाराविना ठेवले अडकवून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 6:21 PM

2022 साली होत असलेल्या फूटबॉल विश्वचषकासाठी भारतातून गेलेल्या मजुरांना या भयानक त्रासातून जावे लागले आहे.

दोहा- सुमारे 600 भारतीय मजुरांना कतारमध्ये अनेक प्रकारच्या त्रासाला आणि छळाला सामोरे जावे लागले आहे. सहा महिने पगार नसणे, नोकरीवरुन काढून टाकणे, व्हीसा संपणे, कामगार वस्तीमध्ये योग्य सुविधांचा अभाव अशा प्रकारच्या अनेक संकटांना या लोकांना सामोरे जावे लागले आहे.2022 साली होत असलेल्या फूटबॉल विश्वचषकासाठी भारतातून गेलेल्या मजुरांना या भयानक त्रासातून जावे लागले आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील 300 लोकांना इतरत्र नोकरी मिळाली आहे तर काही लोकांना भारतात परत आणले आहे. मात्र 8 ते 10 वर्षे कतारसाठी राबणाऱ्या या मजूरांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई कतारने दिलेली नाही. कतारमधील बांधकाम कंपनी एचकेएच जनरल कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीने 1200 मजूरांना काम दिले होते. आर्थिक संकटाचा या कंपनीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या कंपनीकडे काम करणाऱ्या मजूरांची स्थिती अत्यंत दयनीय झाली.आम्हाला आता वाऱ्यावर सोडून दिलं आहे. इथल्या काही लोकांनी आमची दया येऊन अन्न दिलं तर आमचं चालतं. दिवसा आमच्या वाट्याला वीज येत नाही. रात्री जनरेटरचा उपयोग करता येतो. आम्हाला गेले सहा महिने पगार मिळालेला नाही असं केरळच्या एस. कुमार या कतारमध्ये आठ वर्षे काम करणाऱ्या मजूराने आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले. या कंपनीत काम करणाऱ्या एका प्लंबरच्या व्हीसाची मुदत संपली आहे. तो म्हणतो मी आजारी पडल्यावर पकडला जाईन या भीतीने मी हॉस्पिटलमध्येही जाऊ शकत नाही. 25 कामगारांनी याबाबत भारतीय दुतावासाकडे आपल्याला पगार मिळालेला नसल्याचे कळवले. त्यानंतर भारतीय दुतावासाने हे कंपनीशी संपर्क केला मात्र त्याला कंपनीने अद्याप उत्तर पाठवलेले नाही.

टॅग्स :QatarकतारInternationalआंतरराष्ट्रीय