शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ३ दिवसांत ६ हजार लोकांची हत्या, ‘या’ देशात भीषण नरसंहार, संयुक्त राष्ट्रांच्या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 16:18 IST

Sudan-Darfur News: आफ्रिका खंडातील सर्वाधिक अशांत देशांपैकी एक असलेल्य सुदानमध्ये अवघ्या ३ दिवसांत सहा हजार लोकांची हत्ा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाच्या नव्या अहवालामधून ही माहिती समोर आली आहे.

आफ्रिका खंडातील सर्वाधिक अशांत देशांपैकी एक असलेल्य सुदानमध्ये अवघ्या ३ दिवसांत सहा हजार लोकांची हत्ा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाच्या नव्या अहवालामधून ही माहिती समोर आली आहे. या अहवालामधील उल्लेखानुसार ऑक्टोबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दार्फुर क्षेत्रातील अल-फाशेर शहरात झालेल्या या भीषण हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर रक्तपात झाला होता. ही माहिती साक्षीदारांच्या जबाबाच्या आधारावर देण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सुदानमध्ये एप्रिल २०२३पासून लष्कर आणि निमलष्करी दलामध्ये संघर्ष सुरू आहे. एल-फाशेर दार्फुरमध्ये सैन्याचा शेवटचा मोठा तळ होता. १८ महिने चाललेल्या वेढ्यानंतर आऱएसएफने २६ ऑक्टोबर रोजी शहरावर मोठा हल्ला केला. संयुक्त राष्ट्रांच्या रिपो्टनुसार २५ ते २७ ऑक्टोबरदरम्यान, किमान ४ हजार ४०० लोक शहरामध्ये मारले गेले. तर सुमारे १६०० लोक हे जीव वाचवून पळण्याच्या प्रयत्नात असताना मारले गेले. म्हणजेच या तीन दिवसांमध्ये मरणाऱ्यांची संख्या सहा हजार एवढी झाली.

या अहवालातील माहितीनुसार हल्ल्यादरम्यान, मोठ्या प्रमाणावर गोळीबार, घरात घुसून हत्या, महिलांसोबत लैंगिक हिंसाचार, मुलांसह लोकांचं अपहरण करणे, यातना देणे आणि कुठल्याही सुनावणीशिवाय मृत्युदंड देणं यासारख्या कृत्यांचा समावेश होता. यामधील अनेक हल्ले हे वांशिक ओळखीच्या आधारावर करण्यात आले. यातील एका घटनेत सुमारे एक हजार लोकांनी एका युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये आश्रय घेतला होता. तिथे विध्वसंक हत्यारांद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्यात ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर अन्य एका ठिकाणी सुमारे सुमारे ६०० लोकांना एका जागी गोळा करून मारण्यात आले.

दरम्यान, या हत्याकांडामधील मृतांचा आकडा हा आणखी वाढू शकतो, अशी भीती संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे. तसेच गेला काही काळापासून सुरू असलेल्या या संघर्षाने सुदानला जगातील सर्वात मोठ्या मानवी संकटाच्या खाईल लोटले आहे, असेही संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Sudan Massacre: 6,000 Killed in 3 Days, UN Report Reveals Horror

Web Summary : A UN report reveals a massacre in Sudan's Darfur, with 6,000 killed in three days. Ethnic-based violence, mass shootings, and sexual assaults were rampant. The death toll may rise, exacerbating Sudan's humanitarian crisis.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय