शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

5G issue: विमानांना 5G चा धोका! दोन्हींच्या वेव्हजचे बँड एकच; रनवेवर उतरू शकणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 10:57 IST

अमेरिकेच्य़ा विमानतळांवर बुधावारपासून ५जी इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. ५जी सेवा धोकादायक असल्याचे अनेकदा सांगण्यात आले आहे. याच्या ...

अमेरिकेच्य़ा विमानतळांवर बुधावारपासून ५जी इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. ५जी सेवा धोकादायक असल्याचे अनेकदा सांगण्यात आले आहे. याच्या वेव्हचा विमानांच्या यंत्रणेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता अमेरिकेने व्यक्त केली आहे. यामुळे जगभरातील अनेक विमान कंपन्यांनी अमेरिकेकडे जाणारी विमानोड्डाणे रद्द केली आहेत. एअरइंडियाने देखील काल दिवसभरात १४ विमाने रद्द केली आहेत. एअर इंडियाशिवाय इमिरेट्स, ऑल निप्पॉन एअरवेज, जपान एअरलाईनने देखील चिंता व्यक्त करताना फ्लाईट रद्द केल्या आहेत. (5G internet deployment in US Airports.) 

यूएस एव्हिएशन रेग्युलेटर फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) ने 14 जानेवारी रोजी सांगितले की "विमानाच्या रेडिओ अल्टिमीटरमध्ये 5G हस्तक्षेपामुळे इंजिन आणि ब्रेकिंग सिस्टमला लँडिंग मोडमध्ये जाण्यापासून रोखले जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे विमानाला धावपट्टीवर थांबणे अशक्य होऊ शकते." उंचीमापक जमिनीपासून विमानाची उंची मोजतो. अल्टिमीटर ज्या बँडवर काम करतो तो आणि 5G सिस्टीम ज्या बँडवर काम करते ती जवळपास एकसारखीच आहे. यामुळे 5G सेवा विमानांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

एअर इंडियाने ट्विटरवर म्हटले आहे की "अमेरिकेत 5G चालू केल्याने आठ भारत-यूएस उड्डाणे रद्द केली जात आहेत. एअर इंडियाची आठ उड्डाणे आहेत. दिल्ली-न्यूयॉर्क, न्यूयॉर्क-दिल्ली, दिल्ली-शिकागो, शिकागो-दिल्ली, दिल्ली-सॅन फ्रान्सिस्को, सॅन फ्रान्सिस्को-दिल्ली, दिल्ली-नेवार्क आणि नेवार्क-दिल्ली अशी विमाने आहेत. गुरुवारी ऑपरेट होणारी एकूण सहा इंडो-यूएस उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

 

एफएएकडे चिंतादेखील व्यक्त करण्यात आली आहे. हे पत्र अमेरिकेच्या एअरलाईन्स ग्रुपने लिहिले आहे. ५जीमुळे भयंकर विमान संकट उत्पन्न होण्याचा धोका व्यक्त करण्यात आले आहे. या ग्रुपमध्ये United Airlines, American Airlines, Delta Airlines आणि FedEx या कंपन्यांचा समावेश आहे. अमेरिकेच्या यूनाइटेड एअरलाइन्स आणि  अमेरिकन एअरलाइन्स भारतात ये-जा करतात. एअरलाइन्स ग्रुपचे म्हणणे आहे की 5G संपूर्ण यूएस मध्ये कुठेही लागू केले जाऊ शकते. परंतु विमानतळाच्या धावपट्टीपासून 2 मैल दूरपर्यंत त्याची अंमलबजावणी होऊ नये.

टॅग्स :AmericaअमेरिकाAir Indiaएअर इंडिया