शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 06:07 IST

United State News: अमेरिकेत ५.५ कोटींपेक्षा अधिक वैध व्हिसाधारक विदेशी नागरिक चौकशीच्या कक्षेत आले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितले की, सर्व व्हिसाधारकांच्या नोंदींची व्यापक तपासणी सुरू आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेत ५.५ कोटींपेक्षा अधिक वैध व्हिसाधारक विदेशी नागरिक चौकशीच्या कक्षेत आले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितले की, सर्व व्हिसाधारकांच्या नोंदींची व्यापक तपासणी सुरू आहे. यात कामगार, पर्यटक, विद्यार्थी, व्यावसायिक असे सर्व गट येतात. तपासणीत कोणीही इमिग्रेशन नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळल्यास त्याचा व्हिसा रद्द होऊ शकतो किंवा त्याला देशाबाहेर पाठविण्यात येऊ शकते. अहवालानुसार, सुमारे ५० लाख भारतीय नागरिकांकडे अमेरिकेचा व्हिसा आहे.

याचबरोबर, अमेरिकेने व्यावसायिक ट्रकचालकांसाठी सर्व प्रकारच्या वर्कर व्हिसा जारी करण्यावर तातडीने बंदी घातली आहे. फ्लोरिडामध्ये महामार्गावर बेकायदा यू-टर्न घेतल्यामुळे झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात भारतीय ट्रकचालक हरजिंदर सिंह याच्यावर आरोप आहे.

नियम बदलल्यास विद्यार्थ्यांसाठी नोकरी कठीणसध्या अमेरिकेत दरवर्षी ८५,००० एच१बी व्हिसा जारी होतात. यातील ६५,००० सामान्य अर्जदारांसाठी आणि २०,००० अमेरिकेत मास्टर्स किंवा त्याहून उच्च पदवी असलेल्यांसाठी असतात. अर्जांची संख्या मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास अमेरिकन एजन्सी ‘यूएससीआयएस’ संगणकाद्वारे लॉटरी पद्धतीने निवड करते. 

प्रस्तावित बदल काय?नवीन प्रस्तावानुसार, आता निवड वेतन-आधारित असेल. यूएस-सिटिझनशीप अँड इमिग्रेशन सर्व्हिस ‘यूएससीआयएस’ पाहील की अर्जदाराला किती वेतनाची ऑफर आहे. अमेरिकेच्या कामगार विभागाने चार वेतनस्तर ठरवले आहेत : लेव्हल १ – एंट्री-लेव्हल म्हणजेच सुरुवातीचे वेतनलेव्हल २ – काही अनुभव असलेले पात्र कर्मचारीलेव्हल ३ – अनुभवी आणि प्रगत कौशल्य असलेले कर्मचारीलेव्हल ४ – अत्यंत तज्ज्ञ, वरिष्ठ आणि उच्चस्तरीय कर्मचारीसर्वांत जास्त वेतन असलेले अर्जदार प्रथम निवडले जातील.

भारतीयांवर परिणाम काय?  एच१बी व्हिसात भारतीय व्यावसायिकांचे वर्चस्व मोठे आहे – प्रत्येक १० एच१बी व्हिसापैकी जवळपास ७ भारतीयांना मिळतात. २०२३ मध्येच सुमारे १.९१ लाख भारतीयांना एच१बी व्हिसा मिळाला आणि २०२४ मध्ये ही संख्या २.०७ लाखांवर गेली.नवीन नियमांमुळे मध्यम स्तरावरील आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना, ज्यांना एंट्री-लेव्हल वेतन ऑफर होते, व्हिसा मिळवणे कठीण होऊ शकते; तर उच्च पगार देणाऱ्या टेक कंपन्यांच्या उमेदवारांना सहज प्राधान्य मिळेल.

टॅग्स :United StatesअमेरिकाIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय