शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पाकच्या तुरुंगांमध्ये ५३७ भारतीय कैदी; ४८३ मच्छीमारांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 05:46 IST

देशातील तुरुंगात असलेल्या ५३७ भारतीय कैद्यांची एक यादी पाकिस्तानने भारताला सोपविली आहे. द्विपक्षीय संबंधाच्या करारांतर्गत पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे.

इस्लामाबाद : देशातील तुरुंगात असलेल्या ५३७ भारतीय कैद्यांची एक यादी पाकिस्तानने भारताला सोपविली आहे. द्विपक्षीय संबंधाच्या करारांतर्गत पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, या कैद्यांमध्ये ४८३ मच्छीमार आणि ५४ अन्य भारतीय नागरिक आहेत.भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तान सरकारने इस्लामाबादस्थित भारताच्या उच्चायुक्तांना मंगळवारी ५३७ भारतीय कैद्यांची यादी सोपविली आहे. भारत आणि पािकस्तान यांच्यात २१ मे २००८ रोजी झालेल्या करारानुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे.या करारानुसार, दोन्ही देशांच्या ताब्यात असलेल्या कैद्यांची यादी एका वर्षात दोनदा म्हणजे १ जानेवारी आणि १ जुलै रोजी एकमेकांना देण्यात यावी. या करारानुसार भारत सरकारही आपल्या देशातील तुरुंगात असलेल्या पाकिस्तानी कैद्यांची यादी नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना लगेचच सोपविणार आहे.दोन्ही देशांमध्ये तणाव असला तरी सातत्याने दोन्ही देशांकडून कैद्यांची यादी सोपविण्याची परंपरा सुरूआहे. (वृत्तसंस्था)अणुकेंद्रांची दिली माहितीपाकिस्तान सरकारने त्या देशात असलेल्या सर्व अणुकेंद्रांची माहितीही भारत सरकारकडे सोपविली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या करारानुसार अणुकेंद्रांवरील हल्ल्यांना निर्बंध घालण्यासाठी ही माहिती सादर केली आहे. दोन्ही देशांदरम्यान हा करार ३१ डिसेंबर १९८८ रोजी झाला होता. नवी दिल्लीत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय अणुकेंद्रांची यादी पाकिस्तानी उच्चायुक्तांना सोपविली आहे. भारतातर्फेही अशीच माहिती पाकिस्तानला देण्यात येणार आहे.

टॅग्स :jailतुरुंग