मुबी : नायजेरियातील पूर्वोत्तर भागात असलेल्या मुबी शहरात दहशतवाद्यांनी एका मशिदीमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात जवळपास 50 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. येथील स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अदमावा राज्यातील मुबी शहरात असलेल्या मशिदीजवळ हा आत्मघाती बॉम्बस्फोट करण्यात आला. यावेळी मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी अनेक नागरिकांची गर्दी होती. या स्फोटात जवळपास 50 नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
नायजेरियात मशिदीमध्ये दहशतवादी हल्ला, 50 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 16:51 IST
नायजेरियातील पूर्वोत्तर भागात असलेल्या मुबी शहरात दहशतवाद्यांनी एका मशिदीमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात जवळपास 50 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते.
नायजेरियात मशिदीमध्ये दहशतवादी हल्ला, 50 जणांचा मृत्यू
ठळक मुद्देमशिदीजवळ हा आत्मघाती बॉम्बस्फोट करण्यात आला. बोको हराम या संघटनेने हा हल्ला केल्याची शक्यता जवळपास 50 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी