शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

बर्फाच्या चादरीखाली सापडली ४६० किमी लांबीची नदी; नव्या संशोधनामुळे चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 06:15 IST

बर्फ वितळण्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्त

न्यूयॉर्क : पर्यावरणाची हानी होत असताना पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे जीवसृष्टीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. त्यातच आता पूर्णपणे बर्फाच्छादित अंटार्क्टिकातील बर्फाच्या स्तराखाली तब्बल ४६० किलोमीटर लांबीची हिमनदी वाहत असल्याचे पुरावे संशोधकांना सापडल्याने चिंतेत भर पडली आहे. पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे बर्फाच्छादित प्रदेशातील बर्फ वितळण्याचे प्रमाण

अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे यातून सिद्ध झाले आहे. अंटार्क्टिकातील बर्फाच्या चादरीखाली काय घडामोडी घडत आहेत, याचा अभ्यास संशोधक अनेक दशकांपासून करत आहेत. अत्यंत खडतर परिस्थितीत संशोधकांनी अंटार्क्टिकामधील तलावांना जोडणाऱ्या पाण्याच्या सखल वाहिन्यांचे चित्र रंगवण्यास सुरुवात केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, संशोधक प्रथमच अंटार्क्टिकाखालील बर्फाच्या नदीचे थेट सर्वेक्षण करू शकले. बर्फाच्या चादरीवर छिद्र करून खाली एका अरुंद प्रवाहाची झलक त्यांना मिळाली. 

बर्फाखाली नद्यांचे जाळे‘जेव्हा आम्हाला काही दशकांपूर्वी अंटार्क्टिका बर्फाच्या खाली सरोवरांचा शोध लागला, तेव्हा आम्हाला वाटले की ते एकमेकांपासून वेगळे आहेत. परंतु आता आम्हाला समजू लागले आहे की तेथे बर्फाखाली नद्यांचे जाळेच आहे आणि त्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत,’ असे लंडनमधील इम्पिरियल कॉलेजचे संशोधक प्रो. मार्टिन सिगर्ट म्हणाले. 

वेगवान प्रवाहामुळे वितळण्याचे प्रमाणही वाढले...सिगर्ट आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बर्फाच्या स्तराखाली हायड्रोलॉजी आणि एअरबोर्न रडार सर्वेक्षणाच्या माध्यमातून ४६० किलोमीटरची नदी उघडकीस आणली आहे.  त्यांना दिसून आले की ही नदी बर्फाच्या स्तराखालून मार्ग काढत समुद्राला मिळते.

...तर अंदाज लावणे शक्य उपग्रहाच्या मोजमापांवरून आम्हाला अंटार्क्टिकाच्या कोणत्या प्रदेशात बर्फ कमी होत आहे हे माहीत आहे; असे का होत आहे, हे सांगणे अवघड असल्याचे वॉटर्लू विद्यापीठातील अभ्यासक डॉ. क्रिस्टीन डो यांनी सांगितले.

टॅग्स :riverनदीInternationalआंतरराष्ट्रीय