शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

४५ मृत भारतीयांची ओळख पटली; आगीची सखोल चौकशी करणार, कुवैत सरकारची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 06:59 IST

Kuwait Fire: कुवैतमधील अग्निकांडात मरण पावलेल्यांपैकी ४५ भारतीय व फिलिपाईन्सच्या तीन नागरिकांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. या दुर्घटनेत ४९ जणांना जीव गमवावा लागला. त्यापैकी एका व्यक्तीच्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही, असे कुवैत सरकारने सांगितले.

दुबई - कुवैतमधील अग्निकांडात मरण पावलेल्यांपैकी ४५ भारतीय व फिलिपाईन्सच्या तीन नागरिकांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. या दुर्घटनेत ४९ जणांना जीव गमवावा लागला. त्यापैकी एका व्यक्तीच्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही, असे कुवैत सरकारने सांगितले.

मृतदेह लवकरात लवकर भारतात नेता यावेत, यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी सांगितले. या दुर्घटनेत मरण पावलेल्या केरळमधील नागरिकांच्या वारसदारांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय केरळ सरकारने घेतला आहे. उद्योगपती एम. ए. युसूफ, रवी पिल्लई हे सुद्धा मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी ५ लाख रुपये व जखमींना २ लाख रुपयांची मदत देणार आहेत.

भारतीय हवाई दलाचे विमान सज्जnमरण पावलेल्यांची डीएनए चाचणी करण्यात येत आहे. त्यांचे मृतदेह भारतात नेण्यासाठी भारतीय हवाई दलाचे एक विमान सज्ज ठेवण्यात आले आहे.nभारतीयांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, या आगीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णयही कुवैत सरकारने घेतला आहे.

पाण्याच्या टाकीत उडी मारून प्राण वाचविलेकासारगोड : कुवैत येथील मंगाफ येथे बांधकाम कामगारांचे वास्तव्य असलेल्या इमारतीला आग लागल्यानंतर तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नलिनाक्षन या कामगाराने आपला जीव बचावण्यासाठी एक धाडस केले. त्यांनी जवळच्याच पाण्याच्या टाकीत उडी मारली. त्यामुळे आगीपासून रक्षण होऊन त्यांचे प्राण वाचले. नलिनाक्षन हे केरळच्या तिक्करीपूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत. 

टॅग्स :fireआगInternationalआंतरराष्ट्रीय