रशियामधील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये चाकूहल्ला झाला असून, या हल्ल्यात ४ भारतीय विद्यार्थ्यांसह एकूण ६ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे येथील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाललं आहे. भारतीय दूतावासाने या हल्ल्याच्या घटनेला दुजोरा दिला असून, ही घटना दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे.
या हल्ल्याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार हल्लेखोर हा केवळ १५ वर्षांचा मुलगा होता. हल्लेखोर मुलगा हा नॅशनल सोशालिझम व्हाईट पॉवर या नव नाझी संघटनेचा सदस्य आहे. त्याने भारतीय विद्यार्थ्यांना लक्ष्य करून हल्ला केल्यानंतर नाझी आणि वंशवादी घोषणाही दिल्या.
दरम्यान, हल्ल्यानंतर येथील भिंतीवर लाल रंगात स्वस्तिकचं चिन्हही रेखाटण्यात आलं. हे स्वस्तिक हल्ल्यात जखमी झालेल्यांपैकी कुणाच्या तरी रक्ताने काढण्यात आले असण्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोराला पकडताना दोन पोलीस जखमी झाले आहेत. तसेच हल्लेखोराने स्वत:लाही जखमी करून घेतले. आता हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
Web Summary : In Russia, four Indian students were among six injured in a hostel knife attack. The assailant, a 15-year-old neo-Nazi, targeted Indians and drew a swastika in blood on a wall. Police arrested the attacker after he injured himself and two officers.
Web Summary : रूस में एक छात्रावास में चाकू से हमले में चार भारतीय छात्र सहित छह घायल हो गए। हमलावर, एक 15 वर्षीय नव-नाजी ने भारतीयों को निशाना बनाया और दीवार पर खून से स्वास्तिक बनाया। पुलिस ने हमलावर को गिरफ्तार कर लिया, उसने खुद को और दो अधिकारियों को घायल कर लिया था।