शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
6
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
7
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
8
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
9
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
10
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
11
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
12
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
13
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
14
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
15
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
16
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
17
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
18
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
19
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
20
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी

चीनमध्ये वृद्धाश्रमाला आग लागून ३८ मृत्युमुखी

By admin | Published: May 26, 2015 11:53 PM

मध्य चीनमधील हेनान प्रांतात असलेल्या वृद्धाश्रमाला आग लागून ३८ लोक ठार झाले असून, सहाजण जखमी झाले आहेत.

बीजिंग : मध्य चीनमधील हेनान प्रांतात असलेल्या वृद्धाश्रमाला आग लागून ३८ लोक ठार झाले असून, सहाजण जखमी झाले आहेत. लुशान येथील खाजगी मालकीच्या कांग्लेयुआन वृद्धाश्रमाला सोमवारी सायंकाळी आग लागली. यासंदर्भात प्रांतिक कार्यालयाने निवेदन प्रसिद्ध केले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या सहाजणांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या वृद्धाश्रमात ५१ वृद्ध राहत होते. सोमवारी सायंकाळी लागलेली आग विझविण्यास रात्र झाली. रात्री ८.२२ वाजता आग विझल्याचे जाहीर करण्यात आले. मदतकार्य अजूनही सुरूआहे. या आगीतून वाचलेल्या झाओ युलान (८२) यांनी सांगितलेल्या माहितीनुसार झाओ इतर ११ जणांसह एका खोलीत राहत असत, त्याच खोलीतून त्यांना सोडविण्यात आले. फक्त मी व माझी एक रुममेट दोघीच बाहेर पडू शकलो, असे झाओ यांनी सांगितले. या दुर्घटनेतील मृतांचे मृतदेह पूर्ण जळाले असून, नातेवाईकांना ते ओळखणे कठीण जात आहे. २०१० सालच्या अखेरीस या वृद्धाश्रमाला नागरी समितीने मान्यता दिली होती. लुशान प्रांतात असणारा हा वृद्धाश्रम दोन हेक्टरमध्ये पसरला आहे. ६०० चौ. मी. परिसरात एक मजला आहे. या दुर्घटनेतून वाचलेल्या लोकांना त्वरित मदत द्यावी व जखमींना उपचार द्यावेत, तसेच मृतांच्या नातेवाईकांना मदत करावी, असे आदेश चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिले आहेत. तसेच आगीचे कारण शोधून काढून जबाबदार लोकांना त्वरित शिक्षा द्यावी, असेही जिनपिंग यांनी म्हटले आहे. ४चीनमधील सामाजिक स्तर बिघडत असून, वृद्धांची संख्या वाढत आहे. या वृद्धांचे संरक्षण करणे हे फार मोठे आव्हान बनले आहे. चीनमधील लोकसंख्येपैकी १५.५ टक्के लोक वृद्ध आहेत. २०३० पर्यंत चीनमधील चार व्यक्तींपैकी एकजण ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचा असेल. ४जानेवारी महिन्यात चीनमधील ग्वांक्सी झुआंग या स्वायत्त प्रांतात लागलेल्या आगीत २१ घरे जळून खाक झाली होती. या आगीमुळे १३० लोक बेघर झाले होते.