शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

‘३६०, २५० वर्षांचे नागरिक घेताहेत सरकारी योजनांचा लाभ’, ट्रम्प यांनी सांगितली अमेरिकेतील भ्रष्टाचाराची सुरस कहाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 15:39 IST

Donald Trump News: डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यापासून विविध योजनांवर होणारा वायफळ सरकारी खर्च कमी करण्याच्या दिशेने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अमेरिकेतील सामाजिक सुरक्षा योजनांचा गैरफायदा घेऊन निधी हडप करणाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची सुरस कहाणी ट्रम्प यांनी उघड केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यापासून विविध योजनांवर होणारा वायफळ सरकारी खर्च कमी करण्याच्या दिशेने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अमेरिकेतील सामाजिक सुरक्षा योजनांचा गैरफायदा घेऊन निधी हडप करणाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची सुरस कहाणी ट्रम्प यांनी उघड केली आहे. तब्बल ३६०, २५० वर्षांचे नागरिक हडपताहेत सरकारी योजनांचा निधी हडप करत असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सर्वात शक्तिशाली आणि सर्वात प्रगल्भ लोकशाही असलेला देश म्हणून टेंभा मिरवणाऱ्या अमेरिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या सुरस कहाण्या समोर आणल्या. डोनाल्ड  ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये कशाप्रकारे सरकारी पैशांचा अपहार केला जात आहे. तसेच ३६०, २०० आणि १६० वर्षांचे अमेरिकन नागरिक निवृत्तीवेतन आमि सामाजिक सुरक्षा योजनांचा कसा काय लाभ उठवत आहेत, हे उघड केले.

याबाबतचा गौप्यस्फोट करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, सामाजिक सुरक्षा व्यवस्थेमध्ये असलेल्या त्रुटींमुळे आमच्या देशाचं नुकसान होत आहे. आमच्याकडे ३६० वर्षांची एक व्यक्ती आहे जी सामाजिक सुरक्षा व्यवस्थेचा फायदा घेत आहे. म्हणजेच आधुनिक अमेरिकेची स्थापना झालली नव्हती त्याआधी १०० वर्षे आधी जन्माला आलेली व्यक्ती सोशल सिक्युरिटीचा फायदा घेत आहे. 

ट्रम्प पुढे म्हणाले की, यात १ लाख ३० हजार लोक असे आहेत ज्यांचं वय १६० वर्षांहून अधिक आहे. ते सोशल सिक्युरिटीचा धनादेश घेत आहे. १३ लाख लोक असे आहेत. ज्यांचं वय १५० ते १५९ वर्षे असून, ते सोशल सिक्युरिटीचा धनादेश घेत आहेत. 

दरम्यान, अमेरिकेतील सामाजिक सुरक्षा व्यवस्था ही एखाद्या सामाजिक विम्याप्रमाणे काम करते. तसेच कठीण काळात लोकांना आर्थिक मदत देते. या योजनेच्या माध्यमातून निवृत्ती, अक्षमता, महागाई आणि मृत्यूनंतर कुटुंबाला संरक्षण दिलं जातं. या योजनेमुळे लाखो अमेरिकन नागरिकांचा जीवन स्तर उंचावला आहे. ही योजना देशातील सामाजिक कल्याण प्रणालीमधील महत्त्वपूर्ण भाग आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited StatesअमेरिकाCorruptionभ्रष्टाचार