शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानमध्ये JUI-F च्या बैठकीत बॉम्बस्फोट; ३५ जण ठार, २०० हून अधिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 19:57 IST

या स्फोटात आतापर्यंत ३५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर २०० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाजौरमध्ये हा स्फोट झाला. पाकिस्तानी मीडियानुसार,  खैबर पख्तूनख्वामधील बाजौर भागात जमियत-उलेमा-ए-इस्लाम-फजल (JUI-F) च्या बैठकीत हा बॉम्बस्फोट झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. तर या स्फोटात आतापर्यंत ३५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर २०० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

जमियत-उलेमा-ए-इस्लाम-फजलच्या बैठकीला लक्ष्य करून हा स्फोट करण्यात आला. दरम्यान, पोलीस आणि बचाव दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. त्याचबरोबर पोलिसांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. डीआयजी मलाकंद यांनी म्हणाले, बॉम्बस्फोट कसा झाला याबाबत अद्याप काहीही सांगता येणार नाही. तपास सुरु आहे. अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज दोन किलोमीटरपर्यंत ऐकू आला.

दरम्यान, बाजौरमधील जमियत-उलेमा-ए-इस्लाम-फजलच्या बैठकीत झालेल्या स्फोटाचे वृत्त 'भयानक' होते, असे माजी माहिती मंत्री फवाद चौधरी म्हणाले. त्यांनी लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली. तसेच, जमियत-उलेमा-ए-इस्लाम-फजलचे नेते हाफिज हमदुल्ला यांनी सांगितले की, ते देखील आजच्या बैठकीला उपस्थित राहणार होते, परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

हा जिहाद नसून दहशतवाद आहे - हाफिज हमदुल्लामला मिळालेल्या माहितीनुसार, अनेक जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. मी या स्फोटाचा तीव्र निषेध करतो आणि यामागील लोकांना संदेश द्यायचा आहे की, हा जिहाद नसून दहशतवाद आहे.आजची घटना म्हणजे मानवतेवर आणि बाजौरवर हल्ला आहे, असे हाफिज हमदुल्ला म्हणाले. तसेच, या स्फोटाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय, जमियत-उलेमा-ए-इस्लाम-फजलला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही असे घडले आहे. आमच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करण्यात आले आहे. यावर आम्ही संसदेत आवाज उठवला, पण कारवाई झाली नाही, असेही हाफिज हमदुल्ला यांनी सांगितले.

पाकिस्तानमध्ये वाढला दहशतवादया वर्षात पाकिस्तानमध्ये अनेक स्फोट झाले असून, त्यापैकी बहुतांश आत्मघाती स्फोट होते. गेल्या काही दिवसांपूर्वी शिया मशिदीला लक्ष्य करून स्फोट केले होते. काबूलमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर टीटीपीसारख्या दहशतवादी संघटना पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळेच पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले आणि बॉम्बस्फोट मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानBombsस्फोटकेBlastस्फोट