शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानकडून 34 भारतीय मच्छीमारांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 10:21 IST

पाकिस्तानने भारताच्या 34 मच्छीमारांना अटक केल्याची घटना समोर आली आहे. सीमा ओलांडून आपल्या हद्दीत मासेमारी केल्याचा आरोप करत पाकिस्तानने मच्छीमारांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

ठळक मुद्दे पाकिस्तानने भारताच्या 34 मच्छीमारांना अटक केल्याची घटना समोर आली आहे. सीमा ओलांडून आपल्या हद्दीत मासेमारी केल्याचा आरोप करत पाकिस्तानने मच्छीमारांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानी नौदलाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

कराची - पाकिस्ताननेभारताच्या 34 मच्छीमारांना अटक केल्याची घटना समोर आली आहे. सीमा ओलांडून आपल्या हद्दीत मासेमारी केल्याचा आरोप करत पाकिस्तानने मच्छीमारांनाअटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानी नौदलाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या मॅरीटाइम सिक्यॉरिटी एजेन्सीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छीमारांसह 6 बोटीदेखील जप्त करण्यात आल्या आहेत. 

सर्व मच्छीमारांना स्थानिक पोलिसांकडे सोपवण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी नौदला अंतर्गत कार्यरत असलेल्या मॅरीटाइम सिक्यॉरिटी एजेन्सीच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या मच्छीमारांना न्यायिक दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार असून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या आधी जानेवारी महिन्यात पाकिस्तानी नौदलाने काही भारतीय मच्छीमारांना अटक केली होती.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एप्रिल महिन्यात 4 टप्प्यांमध्ये 360 भारतीय मच्छीमारांना भारताच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाकिस्तानने कराचीतील लांधी आणि मालिर येथील तुरूंगातून 250 भारतीय मच्छीमारांची तीन टप्प्यांमध्ये सुटका केली होती. भारतीय मच्छीमारांना सागरी हद्द ओलांडल्यावरून यापूर्वीही अनेकदा पाकिस्तानी नौदलाने अटक केली आहे. 

श्रीलंकन नौदलाकडून 10 भारतीय मच्छीमारांना अटक

सीमा ओलांडून आपल्या हद्दीत मासेमारी केल्याचा आरोप करत श्रीलंकेच्या नौदलाने 10 भारतीय मच्छीमारांना कटचथिऊ येथे काही दिवसांपूर्वी अटक केली होती.  रामनाथपुरम येथील लहान बेट असणाऱ्या कटचथिऊजवळील समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलाने पकडले. त्यांच्याकडील बोट सुद्धा जप्त केली होती. संबंधित मच्छीमार तामिळनाडूमधील थानगचिमदाम येथील रहिवासी आहेत. सीमा ओलांडून आपल्या हद्दीत मासेमारी केल्याचा आरोप करत श्रीलंकेच्या नौदलाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.  दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीलंकेच्या नौदलाकडून एका भारतीय मच्छीमाराला कथितरित्या ठार करण्यावरून थानगचिमदाम येथे शेकडो मच्छीमारांनी निदर्शने केली होती. या घटनेमुळे तणाव निर्माण झाल्यानंतर भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांनी एकमेकांच्या तुरुंगातील मच्छीमारांची सुटका करण्याचा सामंजस्य करार केला. त्यानुसार श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या अनेक भारतीय मच्छीमारांची सुटका करण्यात आली होती.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतArrestअटक