शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे ३१०० बळी; ७० देशांत संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 04:27 IST

देशात कोरोनाची लागण सुरू झाल्यापासूनची संसर्ग झालेल्या नागरिकांची मंगळवारची ही संख्या सर्वात कमी आहे.

बीजिंग : चीनमध्ये कोरोना विषाणूंमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या २९४३ वर पोहोचली आहे. देशात कोरोनामुळे आणखी ३१ जणांचा मृत्यू झाला असून नवे १२५ रुग्ण समोर आले आहेत. देशात कोरोनाची लागण सुरू झाल्यापासूनची संसर्ग झालेल्या नागरिकांची मंगळवारची ही संख्या सर्वात कमी आहे.चीनमधील कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे सांगितले जात असले तरी जगात मात्र या घातक आजाराने पाय पसरले आहेत. आतापर्यंत जगात विविध भागांत ३१०० पेक्षा अधिक लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे, तर संसर्गाचे ९०००० पेक्षा अधिक रुग्ण आहेत. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने मंगळवारी सांगितले की, सोमवारी कोरोनामुळे आणखी ३१ जणांचा मृत्यू झाला. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगात ७० देशांत कोरोना (कोविड-१९) पसरला असून आतापर्यंत ३०५६ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ८९५२७ लोकांना संसर्ग झाला आहे. ज्या ३१ जणांचा मृत्यू झाला आहे ते सर्व हुबेई प्रांतातील आहेत आणि या प्रांताची राजधानी वुहानचे रहिवासी होते. नव्या १२५ रुग्णांपैकी ११४ हुबेईचे आहेत. आयोगाने सांगितले की, सोमवारपर्यंत चीनमधील रुग्णांची संख्या ८०१५१ झाली आहे. यात २९४३ लोेकांचा मृत्यू झाला आहे. ३०००४ रुग्णांवर उपचार सुरू आहे, तर ४७२०४ लोकांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज दिला आहे.>‘उन्हाळ्यापर्यंत उपचार उपलब्ध होईल’अमेरिकेत कोरोना विषाणूंमुळे आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून ९१ जणांना संसर्ग झाला आहे. ज्या सहा जणांचा मृत्यू झाला आहे ते सर्व वॉशिंग्टनमधील होते. संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी ४३ स्थानिक, तर विदेशातून आलेले ४८ जण आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी उपराष्ट्राध्यक्ष पेन्स, आरोग्य अधिकारी यांच्यासह व्हाइट हाउसमध्ये परिस्थितीची समीक्षा केली. पत्रकारांशी बोलताना पेन्स यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. उन्हाळ्यापर्यंत कोरोनावर उपचार उपलब्ध होऊ शकतो.>इराणमध्ये संसदेच्या २३ सदस्यांना संसर्गइराणमध्ये आणखी ११ लोकांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींची संख्या आता ७७ वर पोहोचली आहे. उप आरोग्यमंत्री अलीरेजा रइसी यांनी सांगितले की, आतापर्यंत २३३६ लोकांना याचा संसर्ग झाला आहे. यात ८३५ नवे रुग्ण आहेत. दरम्यान, इराणमधील संसदेच्या २३ सदस्यांनाही हा संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. सरकारने सैन्याला आदेश दिला आहे की, त्यांनी आरोग्य विभागाला मदत करावी.

टॅग्स :corona virusकोरोना