शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानमध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 48 जणांचा मृत्यू, 112 जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 19:13 IST

अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये मतदार आणि ओळखपत्र नोंदणी कार्यालयाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात  48 जण ठार तर  112 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

काबूल - अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये मतदार आणि ओळखपत्र नोंदणी कार्यालयाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात  48 जण ठार तर  112  हून अधिक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे देशात 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी सुरक्षेबाबतची चिंता वाढली आहे.  टोलो न्यूज या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट केंद्राच्या प्रवेशद्वारावर घडला. हा आत्मघातील हल्ला होता. त्यात अनेकांचा बळी गेला, असे काबूल पोलिसांचे प्रमुख दाऊद अमीन यांनी सांगितले.  तर सध्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. दरम्यान,  अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने मृतांच्या आणि जखमींच्या संख्येत झालेल्या वाढीला दुजोरा दिला आहे.   या केंद्रावर नागरिकांच्या राष्ट्रीय ओळखपत्रांची नोंदणी करण्यात येते. हल्ल्याचे नव्याने लक्ष्य बनवण्यात आलेले हे केंद्र काबूल शहराच्या पश्चिमेतील शियाबहूल भागात आहे. अफगाणिस्तानामध्ये दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या निवडणुकांसाठी 14 एप्रिलपासून नोंदणी सुरू करण्यात आली होती. या निवडणुकांमध्ये सुरक्षा व्यवस्था हा चिंतेचा विषय ठरणार असल्याची भीती निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, आज झालेल्या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.  

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानBlastस्फोटnewsबातम्या