शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

स्विस बँकांमध्ये ३०० कोटी बेवारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 04:47 IST

सलग तीन वर्षे कोणतेही व्यवहार न होता निष्क्रिय’ राहिलेल्या ३,५०० खात्यांचा तपशील स्विस बँकांनी याही वर्षी जाहीर केला

झ्युरिच : सलग तीन वर्षे कोणतेही व्यवहार न होता निष्क्रिय’ राहिलेल्या ३,५०० खात्यांचा तपशील स्विस बँकांनी याही वर्षी जाहीर केला असून त्यात भारताशी संबंधित सहा खाती असून त्यातील ३०० कोटी रुपये रकमेवर दावा सांगायला कोणीही पुढे आलेले नाही. स्विस नॅशनल बँकेने यंदा जाहीर केलेल्या यादीत भारताशी संबंधित अशा या प्रत्येक ‘निष्क्रिय’ खात्यात किती पैसे आहेत याचा तपशील नाही. मात्र त्या सर्व खात्यांमध्ये मिळून ४४ दशलक्ष स्विस फ्रँक्स (सुमारे ३०० कोटी रु.) असावेत, असा अंदाज आहे. या सहा खातेदारांपैकी तिघांचे वास्तव्य भारतातील, एकाचे पॅरिस (फ्रान्स) व एकाचे लंडन असे देण्यात आले आहे. सहावा खातेदार नेमका कुठला आहे याची उल्लेख नाही.सन २०१५ पासून स्वित्झर्लंडच्या बँकिंग लोकपालांनी अशा खात्यांची यादी जाहीर करणे सुरु केले. वरील सहा खाती तेव्हापासून या यादीत आहेत. कोणी दावेदार पुढे येऊन त्याने समाधानकारक पुरावे दिले तर ते खाते वगळले जाते. सन २०१५ च्या यादीतील ४० खाती व दोन सेफ डिपॉझिट लॉकरधारकांची नावे अशा प्रकारे गेल्या वर्षी वगळण्यात आली होती.ज्यामध्ये किमान ५०० स्विस फ्रँक्स एवढी रक्कम आहे व गेल्या ६० वर्षांमध्ये ज्यांच्यासाठी कोणीही दावेदार पुढे आलेला नाही अशाच खात्यांमधून ही यादी प्रसिद्ध केली जाते. या यादीत बहुसंख्य खातेदार स्वित्झर्लंडमधीलच आहेत. त्याखेरीज जर्मनी, ब्रिटन, अमेरिका, तुर्कस्तान, आॅस्ट्रिया, पाकिस्तानसह इतरही देशातील खातेदार यात आहेत.यादीत नाव प्रसिद्ध झाल्यापासून वर्षभरात कोणी दावेदार पुढे न आल्यास त्या खात्यातील रक्कम संबंधित खात्यातील रक्कम स्विस सरकारकडे सुपूर्द करू शकते. संबंधित खाते किमान १९५४ पासून ‘निष्क्रिय’ राहिलेले असेल तरदावा करण्यासाठीची मुदत पाच वर्षांची आहे. (वृत्तसंस्था)>जाहीर झालेल्या माहितीनुसार हे सहा खातेदार असे: पिअरे वाचेक व बर्नेट रोझमेरी (मुंबई), बहादूर चंद्र सिंग (डेहराडून), डॉ. मोहन लाल (पॅरिस), योगेश प्रभूदास सूचक (लंडन) व किशोर लाल (वास्तव्याचे ठिकाण अज्ञात). यापैकी एकाची-वाचेक यांची जन्मतारीख १ जानेवारी १९०८ अशी दिलेली आहे. ती खरी असेल, तर ही व्यक्ती आज ११० वर्षांची आहे.

टॅग्स :MONEYपैसा