शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

इम्रान खान यांच्या घरात लपले ३० ते ४० दहशतवादी, हल्लेखोरांना ताब्यात द्या अन्यथा...; सरकारचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 09:34 IST

इम्रान खान यांच्यावर १०० हून अधिक गुन्हे दाखल

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या लाहोर येथील निवासस्थानात ३० ते ४० दहशतवादी लपलेले आहेत. त्यांना चोवीस तासांच्या आत आमच्या हवाली करा अन्यथा कडक कारवाईला सामोरे जा, असा इशारा पंजाबमधील हंगामी सरकारने इम्रान खान यांना बुधवारी दिला. ९ मे रोजी इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर काही दहशतवाद्यांनी लाहोर कॉर्प्स कमांडरच्या घरावर व अन्य लष्करी इमारतींवर हल्ला केला होता. हल्लेखोर लाहोरमधील झमान पार्क येथील निवासस्थानात लपून बसले असल्याची खात्रीलायक माहिती आम्हाला मिळाल्याचा दावा पंजाब सरकारच्या माहिती खात्याचे मंत्री आमीर मीर यांनी केला आहे. 

मला पुन्हा अटक होण्याची शक्यता : इम्रान खान- मला पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे. लाहोरमधील माझ्या घराला पोलिसांनी वेढा घातला आहे, असे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. - उसळलेल्या हिंसाचाराची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कदाचित, मला पुन्हा अटक होण्याआधीचे हे शेवटचे ट्विटही असू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.

इम्रान खान यांच्यावर १०० हून अधिक गुन्हे दाखलइम्रान खान यांच्यावर गेल्या ९ मेनंतर दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांत त्यांना कोणीही अटक करू नये यासाठीची मुदत इस्लामाबाद उच्च न्यायालयाने ३१ मेपर्यंत वाढविली आहे. 

आपल्याला पुन्हा अटक करण्यात येईल अशी शक्यता वाटल्याने इम्रान खान यांनी दिलासा मिळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्या. मियागूल हसन औरंगजेब यांच्यासमोर या याचिकेची सुनावणी झाली. त्यावेळी इम्रान खान न्यायालयात उपस्थित नव्हते.  इम्रान खान यांच्यावर १०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

‘पीटीआय पक्षकार्यकर्त्यांवर जुलूम’पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ (पीटीआय) या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अवैधरीत्या अटक, तसेच काही ठिकाणी त्यांचे अपहरण करण्यात येत असल्याचा आरोप त्या पक्षाचे प्रमुख व माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. ते म्हणाले की, पीटीआय पक्षाचे उपाध्यक्ष शाह मेहमूद कुरेशी आणि महासचिव असद उमर यांना एका आठवड्यापेक्षा जास्त काळ तुरुंगात डांबून ठेवले आहे. आमच्या पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांना सरकार त्रास देत असल्याचा त्यांनी आरोप केला. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानterroristदहशतवादी