शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जगभरात २७ लाख; अमेरिकेत ८ लाख रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 05:48 IST

गत २४ तासांत झपाट्याने वाढले बाधित

न्यूयॉर्क : काेराेनाच्या तिसऱ्या लाटेत जगभरात गेल्या आठवडाभरात जवळपास पाचपटीने रुग्ण रुग्ण वाढले आहेत. गेल्या २४ तासामध्ये जगात २६.९६ लाख नव्या काेराेनाबाधितांची नाेंद झाली असून, ६ हजार ३६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये सर्वाधिक  ८.४९ लाख नवे बाधित आढळले आहेत. त्यापाठाेपाठ फ्रान्समध्ये ३.२८ लाख, ब्रिटनमध्ये १.७८ लाख, स्पेनमध्ये १.१५ लाख, अर्जेंटिनामध्ये १.१० आणि इटलीमध्ये १.०८ लाख बाधितांची नाेंद झाली आहे. फ्रान्समध्ये सहापटींनी रुग्णवाढ झाली असून, तेथील परिस्थिती गंभीर झाली आहे. 

अमेरिकेत कर्मचाऱ्यांची संख्या अपुरीअमेरिकेत दरराेज ७ लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे तेथील आराेग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. कर्मचाऱ्यांना संसर्ग हाेत असल्याने पाेलीस, अग्निशमन दल, बसचालक आदी सार्वजनिक सेवांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे लाेकांपर्यंत आवश्यक सेवा कशा पाेहाेचवाव्या, असा प्रश्न सरकारसमाेर निर्माण झाला आहे. बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे अनेक ठिकाणी टेस्टींग किटचा तुटवडा निर्माण झाला आहे. 

नियमांचे कठाेर पालन  आवश्यक - जागतिक आराेग्य संघटनाया साथीवर नियंत्रण आणायचे असल्यास सार्वजनिक आराेग्य आणि काेराेना नियमावलींचे कठाेर पालन करणे आवश्यक असल्याचे जागतिक आराेग्य संघटनेने म्हटले आहे. संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशियाच्या विभागीय संचालक डाॅ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी सांगितले, की ओमायक्राॅन कमी तीव्र असल्याचे दिसून येत आहे. मात्र त्याचा संसर्ग साैम्य असल्याचे गृहीत धरण्याची चूक करायला नकाे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या