संयुक्त राष्ट्रे : जगातील २६ टक्के लोकसंख्येला पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नाही, तर ४६ टक्के लोक मूलभूत स्वच्छताही पाळत नाहीत, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ४५ वर्षांतील पहिल्या मोठ्या परिषदेच्या पूर्वसंध्येला मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट २०२३’ मध्ये २०३० पर्यंत प्रत्येकाला पिण्याचे शुद्ध पाणी आणि स्वच्छतेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक रूपरेषादेखील दिली आहे.अहवालाचे मुख्य संपादक रिचर्ड कॉनर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, लक्ष्य पूर्ण करण्यासाठी अंदाजे वार्षिक खर्च ६०० अब्ज डॉलर ते १ ट्रिलियन डॉलर दरम्यान आहे. अहवालानुसार, गेल्या ४० वर्षांत जागतिक पाण्याचा वापर दरवर्षी सुमारे एक टक्के दराने वाढत आहे आणि लोकसंख्या वाढ, सामाजिक-आर्थिक विकास आणि बदलत्या वापराच्या पद्धतींमुळे २०५० पर्यंत त्याच दराने वाढ होण्याची अपेक्षा आहे. येथे होणार पाणीटंचाईहवामानातील बदलामुळे मध्य आफ्रिका, पूर्व आशिया आणि दक्षिण अमेरिकेतील काही भागांत पाणीटंचाई वाढेल. पश्चिम आशिया आणि उप-सहारा आफ्रिका भागात पाण्याची स्थिती गंभीर होईल. (वृत्तसंस्था)
जगातील २६% लोक आजही पितात अशुद्ध पाणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 07:19 IST