शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! फोटोशूटमध्ये बिझी होती आई; हलगर्जीपणामुळे पाठीमागे 2 वर्षांच्या लेकाचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 13:07 IST

बाळाचे पालक पुलाच्या समोर उभा राहूनच फोटोशूट करत होते आणि मागे मुलगा हळूहळू खोल पाण्यात गेला.

आयुष्यात जेव्हा बाळ येतं तेव्हा जबाबदाऱ्या वाढतात. प्रायोरिटी बदलते. तुम्ही काहीही करत असलात तरी तुमचं पूर्ण लक्ष आपल्या बाळाकडेच असतं. हे बाळ अगदी कमी काळातच आपल्या आयुष्यातील महत्त्वाचं स्थान घेतं. लहान मुलांना बऱ्याच गोष्टींची समज नसते, त्यामुळे पालकांनाच त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि त्यांची काळजी घ्यावी लागते. मात्र, यात एखादी व्यक्ती कमी पडली तर नक्कीच आयुष्यभर तिला याचा पश्चाताप होत राहतो. अशीच एक हृदयद्रावक घटना आता घडली आहे. 

थायलंडमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 2 वर्षाचा एक मुलगा खेळता-खेळता स्विमिंग पुलमध्ये बुडाला आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा बाळाचे पालक पुलाच्या समोर उभा राहूनच फोटोशूट करत होते आणि मागे मुलगा हळूहळू खोल पाण्यात गेला. एडल्ट साईट Onlyfans ची मॉडेल वियाडा पोंटावी (Wiyada Pontawee) हिला आता आपला मुलगा परत हवा आहे. मुलाच्या मृत्यूमुळे तिला मोठा धक्का बसला आहे.

2 वर्षाचा चवनकोन आपल्या घरातील पुलमध्ये खेळत होता. पालकांचे मॉडेल फ्रेंड्स आपल्याच मस्तीत मग्न होते. पालकही फोटोशूटमध्ये बिझी होते आणि बाळ स्विमिंग पुलमध्ये खेळत होतं. तिथे कोणाचंच त्याच्याकडे लक्ष नव्हतं. त्याच्य तोंडात पाणी शिरल्याने हे बाळ ओरडूही शकत नव्हतं. अचानक त्याच्या आई-वडिलांना काहीतरी वेगळा आवाज येत असल्याचं जाणवलं. मागे वळून पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांचा मुलगा पाण्यात बुडाला होता. लगेचच त्याला बाहेर काढून CPR देण्यास सुरुवात केली गेली. रुग्णालयातही नेण्यात आलं. मात्र त्याचा जीव वाचला नाही.

26 वर्षीय वियाडा पोंटावी एडल्ट साईट Onlyfans ची मॉडेल आहे आणि तिचा पती फोटोग्राफर आहे. त्यादिवशी घरात व्हॅलेंटाईन डेची पार्टी होती. त्यामुळे घरात अनेक पाहुणे होते. या पार्टीचा उद्देश साईटसाठी फोटोशूट करणं हादेखील होता. या पार्टीत अनेक एडल्ट मॉडेल फ्रेंड्सही होते. ज्यामुळे हे बाळ पुलात बुडलं तेव्हा त्याची आई पुलाच्या समोरच फोटोशूट करत होती. आता तिची रडून रडून अवस्था वाईट झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.