शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

दोन प्रवासी विमानांची धावपट्टीवर टक्कर, पंखे झाले नेस्तनाबूत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 21:25 IST

इंडोनेशियाच्या मेडन शहरात धावपट्टीवर उतरत असताना दोन विमानांची टक्कर झाली आहे

जकार्ता, दि. 3 - इंडोनेशियाच्या मेडन शहरात धावपट्टीवर उतरत असताना दोन विमानांची टक्कर झाली आहे. या दुर्घटनेत दोन्ही विमानांचे पंखे तुटले आहेत. लायन एअरलाइन्सचं बोइंग विमान हे धावपट्टीवर उतरल्यानंतर त्यांची विंग्स एअरक्राफ्टच्या विमानाला धडक बसली. हा अपघात एवढा जबरदस्त होता की, दोन्ही विमानांचे पंखे तुटले आहेत. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी या अपघाताचा तपास करत आहेत. 

 या आधी एप्रिल महिन्यात भारतातील  दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला होता. दोन विमाने समोरासमोर आल्याने टक्कर होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने (एटीसी)  वेळीच संपर्क साधल्याने अपघात होता होता टळला.    याआधीदेखील गतवर्षी 27 डिसेंबर रोजी दिल्ली विमानतळावर अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी इंडिगो आणि स्पाईसजेटच्या विमानांची टक्कर होऊन अपघात होणार होता. याशिवाय अशा प्रकारच्या अनेक घटना दिल्ली विमानतळावर घडल्या असून विमानतळ व्यवस्थापन यावर अंकूश ठेवण्यात असमर्थ ठरला आहे. 

विमानांवरून का हटत नाही गुलामगिरीचे प्रतीक VTतुम्ही कोणत्याही भारतीय विमानात चढता तेव्हा त्याच्या रजिस्ट्रेशन नंबरवर नजर अवश्य जाते. हा नंबर VTने सुरू होतो. ज्यांना व्हीटीचा अर्थ माहीत नसतो, ते सर्वसाधारणपणे त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत, मात्र ज्यांना त्याचा अर्थ माहीत असतो त्यांच्या मनात प्रत्येक वेळी प्रश्न उपस्थित होतो की गुलामीचे हे प्रतीक आम्ही कुठवर वाहून नेत राहणार? या VT चा अर्थ होतो ‘व्हाईसराय टेरिटरी’ म्हणजे व्हाईसरायचा भूभाग. भारतीय विमानांच्या नोंदणीक्रमांकात VT नंतर डॅश आणि नंतर नागरी विमान वाहतूक प्राधिकरण आपल्या मापदंडानुसार तीन अक्षर जोडत असते. चित्र बघा. त्यात एअर इंडियाच्या विमानाला VT-ALA हा नोंदणी क्रमांक दिला आहे. भारत पारतंत्र्यात असताना ब्रिटिश शासकाला व्हाईसराय संबोधले जात होते. त्यांच्या अधिपत्याखालील भूभागात विमानांना त्यावेळी हा रजिस्ट्रेशन कोड दिला जायचा. त्यावेळी भारताकडे नोंदणीसाठी नवा कोड मिळविण्याचा पर्याय होता, मात्र भारताने असे केले नाही. पाकिस्तानने मात्र AP हा नवा कोड मिळविला. गुलामगिरीतून मुक्त झालेल्या सर्वच देशांनी नवा कोड मिळविला, हे उल्लेखनीय.