शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानमधील क्वेटामध्ये बॉम्बस्फोट, 17 ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2017 06:12 IST

पाकिस्तानमधील क्वेटामध्ये सुरक्षा रक्षकांच्या ट्रकला लक्ष करुन बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. या बॉम्बस्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 

कराची, दि. 13 - पाकिस्तानमधील क्वेटामध्ये सुरक्षा रक्षकांच्या ट्रकला लक्ष करुन बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. या बॉम्बस्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, क्वेटा येथील हाय सेक्युरिटी असलेल्या परिसरातील पिशिन बस स्टॉपजवळ हा बॉम्बस्फोट करण्यात आला. बलुचिस्तानचे गृहमंत्री मीर सरफराज बुगती यांनी सांगितले की, गस्त घालणा-या सुरक्षा रक्षकांच्या ट्रकला निशाना साधत दहशतवाद्यांनी आत्मघाती  बॉम्बस्फोट घडवून आणला. या बॉम्बस्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमी झालेल्यांना जवळच्याच सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्यांपैकी सहा ते सात जण गंभीर आहेत. तसेच, घटनास्थळी पोलिस आणि बॉम्बशोधक-नाशक पथक दाखल झाले असून तपास सुरु आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. 

दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील चार मांग जिल्ह्यातील बजोर येथे दहशतवाद्यांनी आयईडी बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या बॉम्बस्फोटात 3 जणांचा मृत्यू झाला, तर 26 जण जखमी झाले आहेत. येथील अधिका-यांच्या माहितीनुसार, चार मांग जिल्ह्यातील मजुरांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. दहशतवाद्यांनी बजोरमध्ये मजुरांना घेऊन जाणा-या वाहन रस्त्यावर आयईडी बॉम्बस्फोट घडवून उडवून दिली.