पोर्टलँड/ऑरेगॉन : अमेरिकेत १६ राज्ये आणि कोलंबिया जिल्हा प्रशासनाने अमेरिकी आरोग्य व मानवी सेवा विभागाविरुद्ध (एचएचएस) खटला दाखल केला आहे. स्त्री-पुरुष अशा दोनच लिंगांव्यतिरिक्त विविध लिंग ओळख दर्शवणारे अभ्यासक्रम शैक्षणिक क्षेत्रात ठेवणे म्हणजे संघीय कायद्याचे उल्लंघन असल्याचा इशारा देत यासंबंधीचा निधी थांबवण्याची धमकी या राज्यांना ट्रम्प प्रशासनाने दिली आहे. ऑरेगॉनमधील फेडरल कोर्टात दाखल केलेल्या यासंबंधीच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, संबंधित विभाग शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या लैंगिक श्रेणी हटवण्याच्या दृष्टीने लैंगिक आरोग्यविषयक अभ्यासक्रम बदलण्यास भाग पाडत आहे. ऑरेगॉन संघीय न्यायालयात दाखल याचिकेत नमूद करण्यात आले आहे की, प्रशासनाचे हे पाऊल म्हणजे लैंगिक बदल वा तृतीयपंथीयांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे.
Web Summary : Sixteen states sue the Trump administration over threats to cut funding for gender-inclusive education. They allege it discriminates against transgender students by altering sex education curricula.
Web Summary : लिंग-समावेशी शिक्षा के लिए धन में कटौती की धमकी पर सोलह राज्यों ने ट्रम्प प्रशासन पर मुकदमा किया। उनका आरोप है कि यह यौन शिक्षा पाठ्यक्रम को बदलकर ट्रांसजेंडर छात्रों के साथ भेदभाव करता है।