शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

Ukrainians Sex Party: रशियाची अणू हल्ल्याची धमकी, युक्रेनमध्ये भलतेच सुरुय! हल्ला झालाच तर हजारो लोक डोंगरावर सेक्स पार्टी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 13:00 IST

Russia Ukraine War; एका स्थानिक महिलेने रेडिओ फ्री युरोपला दिलेल्या मुलाखतीत यामागचे कारण दिले आहे. येरुशलेम पोस्टच्या वृत्तानुसार ही पार्टी शहराच्या बाहेर असलेल्या एका डोंगरावर होणार आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये आता आरपारची लढाई सुरु झाली आहे. काहीशी सुस्त पडलेली रशियन सेना आता युक्रेनवर जोराने प्रहार करू लागली आहे. युक्रेनी सैन्याने रशियाचा पूल पाडल्याचा दावा केला जात आहे. यामुळे रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे युक्रेनने नाटोच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे. या साऱ्या घडामोडींवर रशियाने युक्रेनला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. असे असताना युक्रेनमध्ये लोकांचे काहीतरी वेगळेच सुरु आहे. 

युक्रेनी लोक राजधानी कीव्हच्या बाहेरील डोंगरावर एक मोठा इव्हेंट करणार आहेत. रशियाने अण्वस्त्र हल्ला केला, की हे लोक त्या डोंगरावर सेक्स पार्टी करणार आहेत. टेलिग्रामवर यासाठी १५ हजारहून अधिक लोकांनी रजिस्ट्रेशनही केले आहे. येरुशलेम पोस्टच्या वृत्तानुसार ही पार्टी शहराच्या बाहेर असलेल्या एका डोंगरावर होणार आहे. या ठिकाणी लोक हातांमध्ये रंगीत पट्ट्या बांधणार आहेत. असे केल्याने इथे जमणारे लोक त्यांचा 'सेक्सुल इंटरेस्ट' दाखवतील. तीन पट्ट्या आणि चार पट्ट्या असा प्रकार असणार आहे. आयोजकांच्या दाव्यानुसार या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी युक्रेनी लोक अण्वस्त्रविरोधी बंकरांमधून बाहेर पडणार आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या इव्हेंटला युक्रेनी जनतेतून मोठे समर्थन मिळत आहे. 

हे कशासाठी? एका स्थानिक महिलेने रेडिओ फ्री युरोपला दिलेल्या मुलाखतीत यामागचे कारण दिले आहे. ही कृती आशावादी युक्रेनियन भावनेवर आणि युद्ध जिंकण्याच्या त्यांच्या शक्यतांबद्दल आपला आत्मविश्वास दर्शवित आहे. हे निराशेच्या विरुद्ध आहे. अगदी वाईट परिस्थितीतही लोक काहीतरी चांगले शोधत आहेत, असे तिने म्हटले आहे. दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, ही रशियाचा धमकीला प्रत्यूत्तर असणार आहे. ते आम्हाला घाबरविण्याचा प्रयत्न करतील, त्याचे आम्ही यात रुपांतर करून त्यांना दाखवून देऊ. 

असे असले तरी युक्रेनी लोकांमध्ये अण्वस्त्र हल्ल्याची भीती बसलेली आहे. सरकारी यंत्रणा देखील आता युक्रेनमध्ये पोटॅशिअम आयोडाईडच्या गोळ्या वाटू लागली आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवी यंत्रणा निवारा केंद्रांची उभारणी करत आहेत. अणू बॉम्बचा हल्ला झालाच तर लोकांना त्यात लपून राहता येईल. पोटॅशिअम आयोडाईडच्या गोळ्या थायरॉईड ग्रंथींमध्ये खतरनाक रेडिएशन रोखण्यापासून वाचवितात. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाwarयुद्ध