बगदाद : इस्लामिक स्टेटस् वा इसिस या दहशतवादी संघटनेने रविवारी इराकमधील १५ पोलीस अधिकाऱ्यांची हत्या केली असून पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या चार विद्यार्थ्यांचे अपहरण केले आहे. या सर्वांवर मोसूल शहरात परदेशी पत्रकारांशी संपर्क साधल्याचा आरोप आहे. इराकमधील निनेवा प्रांताचे सुरक्षा अधिकारी मोहंमद अल बायेती यांनी दिलेल्या माहितीनुसार हे हत्याकांड व अपहरण इसिसच्या नेहमीच्या कार्यपद्धतीप्रमाणेच आहे. निनेवाची राजधानी मोसूल येथील चौकात जमावाच्या उपस्थितीत १५ अधिकाऱ्यांना गोळ्या घालण्यात आल्या, यामुळे स्थानिक नागरिकांत प्रचंड घबराट आहे. दरम्यान, मोसूल विद्यापीठात पत्रकारिता शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
१५ अधिकाऱ्यांना इसिसकडून फाशी
By admin | Updated: August 3, 2015 23:10 IST