शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 14 मिनिटात उत्तर कोरियाची मिसाइल अमेरिकेत घडवतील विध्वंस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 18:58 IST

उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

ठळक मुद्देफक्त 14 मिनिटात ही क्षेपणास्त्रे गुआममध्ये विध्वंस घडवतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तरकोरियाला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

गुआम, दि. 11 - उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उत्तरकोरियाने अमेरिकेच्या गुआम बेटाला लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. उद्या उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रे डागलीच तर, फक्त 14 मिनिटात ही क्षेपणास्त्रे गुआममध्ये विध्वंस घडवतील. या क्षेपणास्त्रांना अमेरिकन भूमीपर्यंत पोहोचायला फक्त 14 मिनिटे लागतील असे या बेटाच्या महिला सुरक्षा प्रवक्त्याने सांगितले. 

युद्धाचा प्रसंग उदभवल्यास फक्त 15 मिनिटात अलर्ट वॉर्निंग सिस्टिम, सायरनच्या मदतीने लगेच नागरीकांना सर्तक केले जाईल असे या बेटाच्या महिला सुरक्षा प्रवक्त्याने जीन्ना गामींडे यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. उत्तर कोरियाने अमेरिका किंवा आमच्या मित्र राष्ट्रांवर हल्ला केला तर, उत्तरकोरियाने कल्पनाही केली नसेल अशा गोष्टी त्यांच्या बाबतीत घडतील. 

गुआमवर हल्ल्याची आपली पूर्ण योजना तयार असल्याने उत्तरकोरियाने गुरुवारी जाहीर केला. गुआम बेटावर अमेरिकेचे 7 हजार सैनिक तैनात आहेत. लष्कराकडून आम्हाला हल्ल्याची माहिती दिली जाईल. आम्ही सर्व माध्यमांचा वापर करुन लवकरात लवकर लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवू. स्थानिक माध्यम, महापौर आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करु असे जीन्ना गामींडे यांनी सांगितले. तुम्ही सायरन ऐकला तर, पुढच्या सूचनांसाठी लगेच रेडिओ, टीव्ही सुरु करा  असे महिला प्रवक्याने सांगितले. उत्तरकोरियातल्या लोकांनी अमेरिकेविरोधात विरोध प्रदर्शन केलं आहे. तसेच उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग ऊन यांना जाहीर समर्थन दिलं आहे. जर आमच्या हुकूमशाहानं आदेश दिला, तर अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकू, असं उत्तर कोरियाच्या जनतेनं म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला दिलेल्या धमकीनंतर जनतेनं हे विरोध प्रदर्शन केलं आहे. तर दुसरीकडे ट्रम्प पहिल्यापासूनच उत्तर कोरियाला धमकी देत आले आहेत. मात्र यावेळी त्यांनी दिलेली ही शेवटची धमकी समजली जातेय. ट्रम्प म्हणाले होते, उत्तर कोरियानं अमेरिकेला धमकावणं सुरूच ठेवलं, तर जगात कुठल्याही देशाचा झाला नाही, उत्तर कोरियाचा असा विध्वंस करू. ट्रम्प यांच्या या विधानानंतर उत्तर कोरियाच्या जनतेनं अमेरिकेच्या विरोधात प्रदर्शन केलं आहे.