संता क्लारा : अमेरिकेतील अनिवासी भारतीय शुभम् बॅनर्जी हा १३ वर्षांचा मुलगा चक्क उद्योजक बनला आहे. आठव्या वर्गात शिकणाऱ्या शुभम्ने कमी खर्चात ब्रेल लिपी छापणारे मशीन बनवले असून, त्याच्या उत्पादनासाठी इंटेल कॉर्प या कंपनीने सुरुवातीचे भांडवल घातले आहे. ब्रायगो लॅबज् असे या कंपनीचे नाव आहे. शुभम्ने गेल्या वर्षी शाळेतील स्पर्धेसाठी लेगो रोबोटिक कीटच्या साहाय्याने एक ब्रेल प्रिंटर बनवला होता. त्यानंतर त्याने गुगलवर अंध लोक कसे वाचतात याची माहिती पाहिली. ब्रेल प्रिंटरची किंमत २ हजार डॉलर असल्याचे वाचून त्याला धक्काच बसला. ब्रेल प्रिंटरची किंमत एवढी असू नये असे त्याच्या मनाने घेतले. ३५० डॉलरपर्यंत किंमत आणि वजनाने हलका असा ब्रेल प्रिंटर बनविण्याचा निर्णय त्याने घेतला व त्यासाठी अथक प्रयत्न केले. माझे लक्ष्य पूर्ण झाले आणि आता अंध व्यक्तींना सहायक ठरेल असा ब्रेल प्रिंटर तयार झाला. लेगो तंत्राने हा ब्रेल प्रिंटर बनवला म्हणून त्याचे नाव ब्रायगो असे ठेवण्यात आले आहे. अंध समुदायाने या मशीनला जबरदस्त प्रतिसाद दिला.
अमेरिकेत १३ वर्षांच्या भारतीय मुलाची कंपनी
By admin | Updated: January 22, 2015 03:07 IST