शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१२ वर्षांचा राहुल ‘चाइल्ड जिनियस’, भारतीय वंशाच्या मुलाची इंग्लंडमध्ये कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 02:26 IST

ब्रिटनमधील ‘चॅनेल ४’ या दूरचित्रवाहिनीच्या स्मरणशक्ती आणि सामान्यज्ञान यावर आधारित स्पर्धेची अंतिम फेरी जिंकून, राहुल दोशी हा १२ वर्षांचा भारतीय वंशाचा मुलगा ‘चाइल्ड जिनियस’ ठरला.

लंडन : ब्रिटनमधील ‘चॅनेल ४’ या दूरचित्रवाहिनीच्या स्मरणशक्ती आणि सामान्यज्ञान यावर आधारित स्पर्धेची अंतिम फेरी जिंकून, राहुल दोशी हा १२ वर्षांचा भारतीय वंशाचा मुलगा ‘चाइल्ड जिनियस’ ठरला.लंडनमध्ये शिकणाऱ्या  राहुलने शनिवारी रात्री झालेल्या अंतिम फेरीत नऊ वर्षांच्या रोनन याचा १० विरुद्ध ४ असा पराभव केला. म्हणजे अंतिम फेरीत विचारलेल्या सर्व १० प्रश्नांची उत्तरे राहुलने अचूक दिली, तर रोननची फक्त चार उत्तरे बरोबर आली.आठवडाभर चाललेल्या या स्पर्धेत एकूण २० स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात स्पर्धकांच्या स्मरणशक्तीसोबत गणित, इंग्रजी, इतिहास व इंग्रजी स्पेलिंगच्या ज्ञानाचा कस लागला. एडवर्ड जेन्नरने वैद्यकीय क्षेत्रात लावलेले शोध हा राहुलने आवडीचा विषय म्हणून निवडला होता व त्यावरच त्याला सर्वाधिक प्रश्न विचारले गेले, पण त्याला खरा विजय मिळवून दिला, तो १९ व्या शतकातील विल्यम होलमन हंट आणि जॉन एवरेट मिलाईस या दोन कलावंतांशी संबंधित प्रश्नांच्या उत्तरांनी. राहुलचे वडील मिनेश आयटी मॅनेजर, तर आई कोमल फार्मसिस्ट आहे. (वृत्तसंस्था)अजूनही विश्वास बसत नाही, पण खूप बरे वाटले. डोक्यातून इतर सर्व काढून टाकून डोके शांत ठेवून स्पर्धेतील प्रश्नांवर लक्ष केंद्रित करायचे, हे तंत्र मी ठरविले होते, ते यशस्वी ठरले.- राहुल दोशी

टॅग्स :Indiaभारत