शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शेख हसिना यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या 11 जणांना कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 13:11 IST

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांची 28 वर्षांपुर्वी त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 11 दोषींना 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.  1989 साली शेख हसिना यांच्या घरात बॉम्बस्फोट करणाऱ्या दोषींनाही जन्मठेप सुनावण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देदोषींना कोर्टाने 20 हजार टका (240 डॉलर्स) चा दंडही सुनावला आहे. हे लोक बांगलादेश फ्रीडम पार्टीचे सदस्य आहेत.11 ऑगस्ट 1989 रोजी फ्रीडम पार्टीचे लोक त्यावेळेस विरोधी पक्षनेत्या असणाऱ्या शेख हसिना वाजेद यांच्या  धनमोंडी येथील निवासस्थानी आले आणि अंदाधुंद गोळीबार व बॉम्बस्फोटही केला. मात्र सुदैवाने शेख हसिना या हल्ल्यातून बचावल्या.

ढाका- बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांची 28 वर्षांपुर्वी त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 11 दोषींना 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.  1989 साली शेख हसिना यांच्या घरात बॉम्बस्फोट करणाऱ्या दोषींनाही जन्मठेप सुनावण्यात आलेली आहे.या दोषींना कोर्टाने 20 हजार टका (240 डॉलर्स) चा दंडही सुनावला आहे. हे लोक बांगलादेश फ्रीडम पार्टीचे सदस्य आहेत. याच पक्षाचा बांगलादेशचे राष्ट्रपिता वंगबंधू शेख मुजिबूर रेहमान यांच्या हत्येमध्ये सहभाग होता. ढाकाच्या अतिरिक्त महानगरी फौजदारी न्यायालयातील वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार 8 लोकांवर खटला चालवण्यात आला मात्र फ्रीडम पार्टीच्या कर्नल अब्दुल राशिद या अध्यक्षासह इतर दोषी अजूनही परागंदा आहेत. वंगबंधू शेख मुजिबूर रेहमान यांची हत्या करणाऱ्या राशिदला यापुर्वीच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

1971 मध्ये पाकिस्तानच्या सैन्यानं 30 लाख निष्पाप लोकांचा बळी घेतला

रोहिंग्यांची नायिका, वंगबंधूकन्येला शांततेचे नोबेल ?

बांगलादेशमुक्तीचे ते १३ दिवस

बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या मुजिबूर रेहमान यांची 1975 साली हत्या करण्यात आली होती.11 ऑगस्ट 1989 रोजी फ्रीडम पार्टीचे लोक त्यावेळेस विरोधी पक्षनेत्या असणाऱ्या शेख हसिना वाजेद यांच्या  धनमोंडी येथील निवासस्थानी आले आणि अंदाधुंद गोळीबार व बॉम्बस्फोटही केला. मात्र सुदैवाने शेख हसिना या हल्ल्यातून बचावल्या. पोलिसांनी त्यांच्यावर उलट गोळीबार करण्याचा प्रयत्न केला पण आपल्या नेत्यांचा जयजयकार करत मारेकरी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. 1997 आणि 2009 साली या गुन्हेगारांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. 21 वर्षांच्या राजकीय विजनवासानंतर पुन्हा सत्तेत आलेल्या अवामी लीगने 1996 साली या हत्य़ेचा तपास सुरु करुन खटल्याच्या कामकाजास प्रारंभ केला होता.वंगबंधूंच्या हत्येनंतर शेख हसिना यांना मारण्यासाठी किमान 19 वेळा प्रय्तन केला गेल्या अवामी लीगच्या नेत्यांनी सांगितले आहे. 1975 साली उठाव करणाऱ्या 5 नेत्यांना 8 वर्षांपुर्वी फाशी देण्यात आली.