शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

११ शहरांना पाण्याच्या दुर्भिक्षाचा धोका, पिण्याच्या पाण्याची टंचाई, बंगळुरू शहरही काठावर उभे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:10 IST

जगभरातील महत्त्वाच्या ११ शहरांमध्ये भविष्यात पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यात भारतातील बंगळुरूचाही समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन शहरात आताच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

केप टाऊन : जगभरातील महत्त्वाच्या ११ शहरांमध्ये भविष्यात पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यात भारतातील बंगळुरूचाही समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन शहरात आताच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.पृथ्वीचा ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असला तरी त्यापैकी ३ टक्केच पाणी पिण्याच्या योग्यतेचे आहे. जगभरातील १ अब्ज लोकांना पिण्याचे पाणी मिळविण्यास खूपच कष्ट करावे लागतात, तर २.७ अब्ज लोकांना वर्षातील किमान एक महिना पिण्याचे पाणी मिळविणे जवळपास अश्क्य होते. जगातील ५०० मोठ्या शहरांमधील दर चारपैकी एका शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते, असा निष्कर्ष या संदर्भात केलेल्या एका सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.दुष्काळाचा जोरदार तडाखा बसलेल्या केपटाउनमध्ये सध्या जसे पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष निर्माण झाले आहे, तशी स्थिती बंगळुरूसह ११ शहरांमध्ये भविष्यात निर्माण होऊ शकते. भारत व चीनमधील शहरांतील वाढती लोकसंख्या व तिला मिळणारे पिण्याचे पाणी यांचे प्रमाण व्यस्त आहे. बंगळुरू शहरातील सांडपाणी व मलनिस्सारण व्यवस्थाही येत्या काही वर्षांमध्ये तोकडी पडण्याची चिन्हे आहेत. पाण्याच्या पाइपलाइन अत्यंत जुनाट झालेल्या असून, त्या बदलणे आवश्यक आहे. पाण्याच्या गळतीमुळे व गैरवापरामुळे बंगळुरू शहरातील अर्धे पाणी हे सांडपाण्याबरोबर वाहून जाते. बंगळुरू शहरातील एकाही तलावाचे पाणी पिण्यालायक राहिलेले नाही. त्यामुळे त्यांचा उपयोग केवळ औद्योगिक प्रकल्पांसाठी तसेच जलसंधारणासाठी होतो.जगातील ज्या अन्य शहरांमध्ये भविष्यात पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य निर्माण होऊ शकते, त्यामध्ये बिजिंग, कैरो, जकार्ता, मॉस्को, इस्तंबूल, मेक्सिको, लंडन, साओ पावलो, जकार्ता यांचा समावेश असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.बंगळुरूमध्ये दमछाकबंगळुरू शहरात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी आपले जाळे विस्तारले. त्यानंतर देशभरातून तिथे काही लाख लोक राहावयास आले. शहराची संख्या वाढली. तसे बांधकामांनाही वेग आला. शहराचा विकास होऊ लागला. मात्र वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतक्या पिण्याच्या पाण्याची सोय करताना बंगळुरु शहराच्या पालिकेची व शासनाची दमछाक होत आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयWaterपाणी